मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री बरीच चर्चेत आहे. तिचे लुक्स, कपडे यामुळं ती फॅशन आयकॉन देखील मानली जाते. तिचा चाहतावर्गही मोठा आहे. परंतु सोशल मीडियापासून करिना दूरच होती. करिनाच्या चाहत्यांनी तिला अनेकदा सोशल मीडियावर येण्याची विनंती केली होती. अखेर चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली असून बबो म्हणजेच करिनाची आता इन्स्टाग्रामर एन्ट्री झाली आहे.

करिनाला बॉलिवूडमधील सर्व गोष्टींची माहिती असते. तिला ‘गॉसिप क्वीन’ देखील म्हटलं जातं. बॉलिवूडमध्ये कोण काय करतयं, कोणाचं भांडण सुरू आहे, या गोष्टींची करिनाला माहिती असते, असा खुलासा एका चॅट शोदरम्यान दिग्दर्शक करण जोहर यानं केला होता. परंतू ती सोशल मीडियावर सक्रीय नसल्यानं चाहत्यांमध्ये नाराजी होती. करिनाची बहीण करिश्मा तिचे काही फोटो शेअर करत असे. पंरतू आता करिना इन्स्टाग्रामवर आल्यानं चाहत्यांना तिचे सर्व अपडेट्स मिळणार आहेत. करिनानं डीपी म्हणजेच प्रोफाइल पिक्चर म्हणून लहानपणीचा फोटो लावला आहे.

करिना कपूर आणि अभिनेता रणबीर कपूर यांचं इन्स्टाग्रामवर सिक्रेट अकाऊंट असल्याची चर्चा सुरू होती. कारण ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्री स्वरा भास्कर हिला विचारण्यात आलं की, तुला कोणत्या सेलिब्रिटीला सोशल मीडियावर फॉलो करायला आवडतं? तेव्हा क्षणाचाही विलंब न करता तिनं करिना कपूरचं नावं घेतलं होतं. स्वराच्या या उत्तरावर सोनम कपूर देखील हसताना दिसली होती.

या आधी देखील करिनाला अनेकदा सोशल मीडियावर कधी येणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. पण करिनाला सोशल मीडियावर येण्यात काहीच रस नसल्याचं तिनं म्हटलं होतं’ मला माझं आयुष्य खासगी ठेवायला आवडतं, आणि मी सोशल मीडियावर नसतानाही माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी सोशल मीडियावर पाहायला मिळतात, त्यामुळं मी सोशल मीडियावर मी नसूनही असल्यासारखीच आहे, असंही करिना म्हणाली होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here