द्वारे लेखक | महाराष्ट्र टाईम्स डॉट कॉम | अद्यतनित: ऑक्टोबर 28, 2021, 10:55 AM

करोनाची दुसरी लाट ओसरत असताना आणि राज्यातील सर्व व्यवहार हळूहळू खुले होत असतानाच, राज्य सरकारची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना करोनाची लागण झाली आहे.

दिलीप-वळसे-पाटील

दिलीप वळसे पाटील यांना करोना

हायलाइट्स:

  • राज्य सरकारची चिंता वाढवणारी बातमी
  • गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना करोनाची लागण
  • संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचं केलं आवाहन

पुणे: करोनाची दुसरी लाट ओसरत असताना आणि राज्यातील सर्व व्यवहार हळूहळू खुले होत असतानाच, राज्य सरकारची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (दिलीप वळसे पाटील) यांना करोनाची लागण झाली आहे.

वळसे पाटील यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘करोना सदृश्य लक्षणं दिसत असल्यानं मी माझी टेस्ट केली असून माझा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहेत,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं व कोरोना नियमांचं काटेकोर पालन करावं,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here