लंडन: करोना चाचणी आणि रुग्ण शोध मोहीम आखूनही करोना नियंत्रणात येऊ शकला नाही. त्यामुळे ब्रिटिश सरकारने केलेला ३७ अब्ज पौंडांचा खर्च वाया गेल्याचा ठपका संसदेच्या वित्तलेखा समितीने ठेवला आहे.

सरकार आणि या कार्यक्रमाचे अननुभवी प्रमुख दिदो हार्डिंग यांनी अतिआत्मविश्वास दाखवला, असाही ठपका समितीने ठेवला आहे. ‘या मोहिमेत जे काही हाती लागले ते अति टोकाची आश्वासने आणि पाण्यासारखा पैसा वाया गेला,’ असा ठपका विरोधी पक्षाच्या नेत्या मेग हिलियर यांनी ‘बीबीसी रेडिओ’ला सांगितले. ‘करदात्यांच्या पैशाची किंमत ठेवली गेली नाही हे आम्हाला अधिक चिंताजनक वाटते. करदात्यांचा वापर जणू ‘एटीएम’सारखा करण्यात आला,’ असेही त्या म्हणााल्या.

करोना विषाणूचा आणखी एक प्रकार; जाणून घ्या किती आहे घातक?

ब्रिटनमध्ये गेल्या वर्षी करोनाची साथ होती. त्या काळात ब्रिटन सरकारने ‘टेस्ट अँड ट्रेस’ कार्यक्रम आखला होता. नव्या रुग्णांच्या चाचण्या करणे आणि लागण झालेल्यांचा व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते; पण त्या काळात ही मोहीम अपयशी ठरली आणि रुग्णसंख्या भरमसाट वाढली. आताही ब्रिटनमध्ये अधिक मृत्यू होत आहेत. युरोपात सर्वाधिक मृत्यू रशियात होत असून, त्यापाठोपाठ ब्रिटनचा क्रमांक आहे.

४० लाख लोकसंख्या आणि फक्त ६ करोनाबाधित; तरी संपूर्ण शहरात लॉकडाऊन!

‘या मोहिमेसाठी हार्डिंग आणि सरकार हे बाहेरील ठेकेदारांवर अधिक अवलंबून राहिले. सरकारी राष्ट्रीय आरोग्य सेवेचे जाळे देशात असूनही त्यांची मदत त्यांनी घेतली नाही. सरकारच्या मोहीमेत मर्यादित स्वरूपात सेवा होती आणि काही मोजक्या लोकांच्याच चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे करोनाची साखळी तोडण्याचे उद्दिष्ट या मोहीमेत यशस्वी झाले नाही आणि लोकांनाही पूर्वपदावर आयुष्य जगता आले नाही,’ असा ठपका समितीने ठेवला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here