आगामी निवडणुकीत युती करण्यासंदर्भात अद्याप निर्णय झाला नसला तरी याबाबतीत सर्वाधिकार पक्षाध्यक्ष यांच्याकडे आहेत. मनसेने नाशिक शहराचा विकास, गोदावरीकाठ विकासाच्या धर्तीवर अकोला शहरातील मोर्णानदीचा विकास, शहरविकासाचा ब्ल्युप्रिंट मनसे सादर करणार आहे. तर जिल्हा परिषद तसेच नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सुध्दा पक्षांतर्गत तयारी करण्यात आली असून यानिवडणुकांसाठी देखील उमेदवार उभे करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष तथा अकोला संपर्क प्रमुख विठ्ठल लोखंडकार यांनी शासकीय विश्रामगृहतील पत्रकार परिषदमध्ये दिली.
यापुढे कोणताही कार्यकर्ता मुंबईशी संपर्कात राहणार नसल्याचाही सल्ला यावेळी मनसे उपाध्यक्ष यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष राजेश काळे, जिल्हाध्यक्ष पंकज साबळे तसेच अरविंद शुक्ला, राकेश शर्मा, सौरभ भगत, पंजाबराव देशमुख, अॅड. लोंढे, आदित्य दामले, ललीत येवलेकर, रुपेश तायडेसह मनसे कार्यकर्ते उपस्थिती होते.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times