हिंगोली : राज्यातील विविध भागात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवासी कोंडीत सापडले आहेत. हिंगोलीमध्ये आज एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्यामुळे सकाळपासून एकही बस डेपोमधून बाहेर निघाली नाही. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या प्रवाशांची चांगलीच कोंडी झाली. त्या लोकांना आंदोलनाची कल्पना नाही अशा लोकांना बसस्थानकामध्ये सकाळपासून ताटकळत बसण्याची वेळ आली आहे.
संयुक्त कृती समितीच्या कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवत उपोषण सुरू केलं आहे. हिंगोली आगारातील सर्वच एसटी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याची ठाम भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली. सकाळपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणा संदर्भात आत्तापर्यंत कोणताही तोडगा निघाला नसून कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. Ajit Pawar: अजित पवारांना आणखी एक धक्का! मावसभावाच्या घरी ईडीची धाड थकित महागाई भत्ता राज्य शासनाच्या प्रमाणे २८ टक्के प्रमाणे मिळाला पाहिजे. वाढीव घर भाडे ८, १६, २४च्या मिळाला पाहिजे. ठरल्याप्रमाणे वार्षिक वेतन वाढीचा दर दोन टक्के एवजी तीन टक्के प्रमाणे वाढवून मिळावा, दिवाळी बोनस पंधरा हजार रुपये मिळावे, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेत नियमितपणे वेतन मिळाले पाहिजे, कामगार कराराप्रमाणे सर्व कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळाला पाहिजे, सण उचल बारा हजार पाचशे रुपये मिळाला पाहिजे. दिवाली पूर्वी कामगारांना आर्थिक लाभ मिळाला पाहिजे, अशा मागण्या घेऊन संयुक्त कृती समिती व एसटी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत.