हायलाइट्स:

  • नीट निकालाचा मार्ग मोकळा
  • निकाल जारी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे एनटीएला आदेश
  • दोन विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती

NEET UG Result 2021 Update: गेले अनेक दिवस रखडलेला नॅशनल एलिजिबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट अर्थात नीट निकाल (NEET निकाल 2021) लवकरच जाहीर केला जाणार आहे. नीट निकालाच्या मार्गातला अडथळा गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला. नीट निकाल जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला दिले. त्याचवेळी दोन विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली. ज्या दोन विद्यार्थ्यांमुळे हा निकाल रोखण्यात आला होता, त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्यात येईल असे एनटीएने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एल नागेश्वर राव, संजीव खन्ना आणि बी. आर. गवई यांनी ही विशेष नोटीस जारी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या २० ऑक्टोबर २०२१ च्या आदेशाला नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लीव्ह पीटीशनच्या माध्यमातून आव्हान दिले होते. चुकीच्या उत्तरपत्रिका दिल्यामुळे महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. परिणामी या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतल्याशिवाय एनटीएला नीट २०२१ चा निकाल जाहीर करता येत नसल्याने निकालाला विलंब झाला होता.

मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाला स्थगिती देत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारच्या सुनावणीत नीट निकालाचा पेच सोडवला. या विद्यार्थ्यांची कोणतीही चूक नसल्याने त्यांच्यावर अन्याय न करता निकाल जाहीर केला जावा, असे न्यायालयाने एनटीएला सांगितले. या दोन विद्यार्थ्यांच्या प्रकरणावर नंतर सुनावणी घेतली जाईल, असेही न्यायालायाने स्पष्ट केले.

त्यामुळे आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी कुठल्याही वेळी निकाल जाहीर करेल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की NEET 2021 चा निकाल आणि स्कोअर कार्ड neet.nta.nic.in या परीक्षा पोर्टलवर प्रसिद्ध केले जातील, त्यामुळे उमेदवारांनी पोर्टलवर लक्ष ठेवावे.

नीट यूजी २०२१ निकाल लवकरच; महत्वाची कागदपत्रे आणि प्रवेश प्रक्रियेबद्दल जाणून घ्या
दोन मुलांसाठी ‘नीट’ परीक्षा पुन्हा; मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
NEET रिझल्ट येण्याआधी जाणून घ्या देशातील टॉप २० मेडिकल कॉलेजची यादी

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here