कोल्हापूर : शेजारच्या दिव्यांग मुलीस दुचाकी खरेदीस कर्ज मिळणार नसल्याने स्वत:कडील एक लाख रुपये देऊन नवीन दुचाकी शेजाऱच्या दिव्यांग तरुणीस देण्याचे दातृत्व कोल्हापूरातील एका निवृत्त बँक अधिकाऱ्याने दाखवत माणुसकीचा आदर्श पाठ समाजापुढे घालून दिला.

कोल्हापूरातील सानेगुरुजी व्यंकटेश कॉलनी येथील विनायक कुलकर्णी बँक ऑफ इंडियातून निवृत्त झाले आहे. निवृत्तीनंतर गरजूंना मदत करण्यासाठी ते सदैव तत्पर असतात. सेवा निलयम् संस्थेच्यावतीने लोकोपयोगी कामात मदत करतात. त्यांच्या घराच्या शेजारी राधानगरी तालुक्यातील केळोशी येथील संगीता जरंडे ही दिव्यांग तरुणी राहते. या तरुणीला नोकरीवर जाण्यासाठी बाईकची गरज होती.

जोशी हे निवृत्त बँक अधिकारी असल्याने संगीताने बाईक खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या कर्जाची माहिती विचारली. पण संगीताला बँकेत कर्ज मिळू शकणार नाही हे लक्षात आल्यावर विनायक कुलकर्णी यांनी पत्नी वृषाली यांच्याशी चर्चा करुन स्वखर्चातून संगीताला बाईक खरेदी करण्याचा निर्णय घेतला. दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर बाईक खरेदी करुन दोन्ही बाजूला दोन जादा चाके बसवून संगीताला बाईक प्रदान केली. बाईक प्रदान कार्यक्रमाच्यावेळी जोशी दांपत्यासह स्मिता दिवसे, चैतन्य अष्टेकर, ऐश्वर्य मुनीश्वर उपस्थित होते.
समीर वानखेडेंवरील आरोपांची चौकशी सुरू असतानाच जयंत पाटील यांचं मोठं विधान

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here