हायलाइट्स:
- उत्तर प्रदेश पोलिसांची बेकायदेशीर कारवाई
- ‘दिल्लीत ताब्यात घेऊन शामलीला कशी अटक दाखवता?’
- ‘…तर उत्तर प्रदेश पोलिसांवर कारवाई होणार’
‘अशा पद्धतीच्या वर्तनाची परवानगी दिल्लीत दिली जाणार नाही. तुम्ही इथे अवैध कृत्यं करू शकणार नाहीत’ असं म्हणत न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांच्या खंडपीठानं यूपी पोलिसांकडून कोर्टासमोर हजर झालेल्या अधिकाऱ्यांना फटकारलं.
विवाहीत जोडप्याच्या वयाची योग्य ती पडताळणी केल्याशिवाय अटक करण्यासाठी जाणाऱ्या उत्तर प्रदेश पोलिसांना न्यायालयानं चांगलंच झापलंय. ‘कुणी तुमच्याकडे तक्रार घेऊन आलं तर जोडप्यांना ते सज्ञान आहेत किंवा अल्पवयीन हे जाणून न घेता आणि त्यांचं वय लक्षात न घेताच तुम्ही अटक करायला कसे निघता?’ असं म्हणत पोलिसांच्या वर्तनावर न्यायालयानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
… तर पोलिसांवरच होणार कारवाई
उत्तर प्रदेश पोलिसांनी दिल्लीतून लोकांना ताब्यात घेऊन शामलीमध्ये अटक करण्यात आल्याचं दाखवल्याचंही न्यायालयानं नमूद केलं. आम्ही याची कदापि परवानगी देणार नाही, असं म्हणत न्यायालयानं पोलिसांना कायदेशीर पद्धतीनेच काम करण्याची समज दिली. इतकंच नाही तर ‘संबंधितांना अटक करण्यासाठी शामली पोलीस दिल्लीत आल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आलं तर त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी होईल, हे आम्ही सुनिश्चित करू’ असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाच चौकशी कशी करावी हे माहीत नसेल तर याचं आमच्याकडे कोणतंही उत्तर नाही, अशी खंतही न्यायालयानं व्यक्त केली.
काय आहे प्रकरण?
संबंधित प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात एका जोडप्यानं याचिका दाखल केली होती. १ जुलै २०२१ रोजी आपल्या मर्जीनं आपण विवाह केला असून तरुणीच्या आई-वडिलांचा या विवाहाला विरोध आहे. तरुणीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी तरुणाच्या भावाला आणि वडिलांना ६-७ ऑगस्ट रोजी राज्ञी उशिरा त्यांच्या निवासस्थानावरून ताब्यात घेतलं होतं. मात्र, त्यांच्या ठावठिकाणासंबंधी अद्याप माहिती मिळाली नसल्याचं जोडप्यानं आपल्या याचिकेत म्हटलंय.
UP Elections: पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांची सद्यस्थितीही जाणून घ्या… .
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times