हायलाइट्स:
- ६ नोव्हेंबर रोजी केदारनाथ धामचे दरवाजे बंद होणार
- ५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान मोदी केदारनाथला देणार भेट
- मोदींच्या जनसभेचंही आयोजन
सोबतच, पंतप्रधान मोदी कार्यान्वित योजनांच्या कामाची समीक्षा करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आलीय. वाढत्या थंडीमुळे निर्धारीत केल्यानुसार, ६ नोव्हेंबर रोजी केदारनाथ धामचे दरवाजे बंद होणार आहेत.
पंतप्रधान मोदी येत्या ५ नोव्हेंबर रोजी केदारनाथ मंदिरात पूजा अर्चना केल्यानंतर आदि शंकराचार्य यांच्या समाधीचं उद्घाटन करतील तसंच त्यांच्या मूर्तीचं लोकार्पणही करतील, असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.
UP Elections: पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांची सद्यस्थितीही जाणून घ्या… .
२०१३ साली आलेल्या महाप्रलयात ही समाधी उद्ध्वस्त झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ही समाधी उभारण्यात आलीय. समाधीच्या पुननिर्माणाचं काम खुद्द पंतप्रधानांच्या देखरेखीत आणि निर्देशांखाली करण्यात आल्याचं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.
सरस्वती आस्थापथ आणि घाट, मंदाकिनी आस्थापथ, तीरथ पुरोहित निवासस्थान आणि मंदाकिनी नदीवरील गुरुड छत्ती पूल यासह इतर अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यावेळी करतील. या योजनांसाठी १३० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आलाय.
यासोबतच पंतप्रधान मोदींच्या हस्ते जवळपास १८० कोटी रुपये खर्चाच्या अनेक प्रकल्पांची पायाभरणीही होणार आहे. यामध्ये संगम घाटाचा पुनर्विकास, प्रथमोपचार आणि पर्यटक सुविधा केंद्र, प्रशासकीय कार्यालय आणि रुग्णालय, मंदाकिनी आस्थपथ लाइन व्यवस्थापन, पर्जन्य संरक्षण स्थळ आणि सरस्वती नागरी सुविधा इमारतीचा पुनर्विकास समाविष्ट आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times