गुहागर : राजकीय नेत्यांना प्रसिद्धीशिवाय चैन पडत नाही त्यासाठी त्यांना प्रसिद्धीमाध्यमे हवी असतात. पण रत्नागिरी जिह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुहागरमध्ये मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना तेथून निघून जाण्याचे आदेश दिले. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या या ‘चले जाव’ च्या घोषणेमुळे गुहागरमधील पत्रकारांमध्ये नाराजी आहे. त्यांनी याचा निषेध केला आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या रत्नागिरी जिह्याच्या दौऱ्यावर आहेत. पाटील यांच्या उपस्थितीत होत असलेल्या पक्ष बैठकीत स्थानिक पत्रकराना मज्जाव केला जात आहे. यामागची पाटील यांची नेमकी भुमिका समजू शकलेली नाही?

काल नियोजित वेळेपेक्षा तब्बल चार तासाने गुहागर येथील सभेला आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सभेच्या ठिकाणी पत्रकार उपस्थित होते. पाटील यांनी सभेला सुरुवात होण्यापूर्वीच पत्रकारांनी येथून जावे, असा ‘चलेजाव’ चा एकप्रकारे सूचना दिल्याने पत्रकारांना आश्चर्याचा धक्काच बसला.
डेपोत उभ्या एसटी बसला गळफास लावून घेत चालकाची आत्महत्या
गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सभा मोडकाआगर येथील पूजा मंगल कार्यालयात काल गुरूवारी दुपारी दीड वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेला राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील पञकाराना निमंत्रित केले होते. दुपारी दीड वाजता सुरु होणाऱ्या या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तब्बल चार तास उशिरा आले. त्यामुळे ही सभा संध्याकाळी ४:३० वाजता सुरु झाली. सभा सुरू होण्यापूर्वीच जयंत पाटील यांनी पञकाराना पाहून तुम्ही येथून जा, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते सभेनंतर विचारा असे सांगून पत्रकारांना बाहेरचा रस्ता दाखविला.

मुळात या कार्यक्रमाला यावे असे निमंत्रण तालुका राष्ट्रवादीकडून देण्यात आले असताना पक्षाच्या वरिष्ठांकडून पत्रकारांना मिळालेल्या वागणुकीबाबत पत्रकारांनी नाराजी व्यक्त करून निषेध केला.
मुंबईत सायको किलर! १५ मिनिटांत पेव्हर ब्लाॅकने ठेचून केली दोघांची हत्या

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here