छापली. यात उत्तर पूर्वी दिल्लीच्या जाफराबाद मध्ये राहणाऱ्या एका १३ वर्षीय मुस्लिम मुलीवर हिंसाचारात हिंदू जमावाने बलात्कार केल्याचा दावा केला आहे.
रिपोर्टचे शीर्षक ‘ Gang Raped 13 Year Old Muslim Girl In Jaffrabad Delhi’ असे होते. रिपोर्टच्या माहितीनुसार, संतापलेल्या हिंदू जमावाने मुस्लिम मुलीवर हल्ला केला. तिचे घर जाळले. मुस्लिमांना घेराव घातला. मुलीने पळण्याचा प्रयत्न केला तर हिंदू जमावाने तिला खेचले. तसेच तिला बाजुच्या झोपडीत नेऊन तिच्यावर ७ जणांनी बलात्कार केला. रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, हिंदुंनी त्या अल्पवयीन मुलीसोबत ओरल सेक्स आणि सोडॉमी करण्यासाठी दबाव टाकला होता.
या रिपोर्टमध्ये भारतीय ट्विटर युजर्स ने शेअर केला. यात असुदुद्दीन ओवेसी यांचा पक्ष एमआयए चे सदस्य जुबेर मेमन यांचाही समावेश आहे. त्यांनी हा रिपोर्ट १ मार्च रोजी ट्विट केला होता.
रिपोर्टमध्ये हिजाब घातलेल्या एका महिलेचा फोटो होता. तिचा चेहरा स्पष्ट दिसणार नाही, असा केला होता.
खरं काय आहे ?
ही बातमी खोटी आहे. दिल्लीच्या जाफराबादमध्ये हिंदुंनी कोणत्याही मुलीवर बलात्कार केला नाही.
कशी केली पडताळणी?
आम्ही वेगवेगळ्या सर्च इंजिनवर अनेक कीवर्ड्स सर्च केले. परंतु, आम्हाला एकही रिपोर्ट मिळाला नाही. ज्यांनी या वृत्ताला दुजारो दिला आहे.
यानंतर आम्ही बातमीत वापरलेल्या फोटोला रिव्हर्स इमेज सर्ज केले. त्यानंतर आम्हाला ‘We are all GIRL’S আমরা সবাই মেয়ে’ नावाचे फेसबुक पेजवर याच्याशी मिळता जुळता फोटो मिळाला. हे पेज बांगलादेशचे असण्याची शक्यता आहे. यावर हिजाब घातलेल्या वेगवेगवळ्या महिलांचे अनेक फोटो अपलोड करण्यात आले.
हा फोटो २८ जानेवारी २०१८ रोजी अपलोड करण्यात आली होती.
टाइम्स फॅक्ट चेकने यानंतर जाफराबाद SHO सत्यदेव यांच्याशी संपर्क केला. त्यांनी ही बातमी खोटी असल्याचे सांगितले. दिल्लीत हिंसाचारादरम्यान जाफराबाद मध्ये कोणत्याही महिलेवर बलात्कार झाला नाही.
यानंतर आम्ही Republic of Buzz वेबसाइटवर दुसरी रिपोर्ट पाहिली. या वेबसाइटवर नेहमी भारत आणि हिंदू विरोधी पोस्ट टाकलेल्या आढळल्या.
उदाहरणासाठीः
वेबसाइटवर अधिक रिपोर्ट्स या पाकिस्तानमधील घटनेवर आहेत. ही साइट पाकिस्तानी सेनेचे समर्थक म्हणून बातमी छापते, असे जाणवते.
या वेबसाइटचे फेसबुक पेज ६ लोक चालवतात. आणि हे सर्व पाकिस्तानी आहेत.
यानंतर आम्ही हिंदू जमावाकडून मुस्लिम मुलीवर बलात्कार अशी बातमी लिहिणाऱ्या Alila Chophy Naga चे फेसबुक पेज पाहिले. फेसबुक पेजनुसार, नागालँडची फुटीरतावादी आहे. या पेजवर भारत आणि भारतीय सैन्य यांच्यासंबंधी अर्धवट माहिती आणि अपमानजनक असलेले पोस्ट टाकले आहे.
उदाहरणः
निष्कर्ष
दिल्लीतील हिंसाचारादरम्यान एका अल्पवयीन मुस्लिम मुलीवर हिंदू जमावाकडून बलात्कार करण्यात आल्याचे वृत्त खोटे आहे, वृत्त छापणारी वेबसाइट ही पाकिस्तानातून चालवण्यात येत असून ते नेहमी भारतविरोधी वृत्त छापत असल्याचे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times