हायलाइट्स:
- तृणमूल काँग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जी गोव्यात
- ‘राज्यात दिल्लीची दादागिरी चालणार नाही’
- बंगाल एवढीच गोवा हीदेखील माझी मातृभूमी : ममता बॅनर्जी
‘मी इथे तुमचे हक्क हिरावून घेण्यासाठी आलेले नाही तर तुमची मदत करण्यासाठी आलेय’, असं म्हणत ममता यांनी गोवेकरांना साद घातली.
ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तसंच टेनिस चॅम्पियन लिएन्डर पेस, नफीसा अली आणि मृणालिनी देशप्रभू यांनी आज औपचारिकरित्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दिल्लीची दादागिरी चालणार नाही. संविधानाचा पाया मजबूत राहावा हीच आमची इच्छा आहे. गोव्यात संस्कृती आणि वारसा कायम राहावा यासाठी संपूर्ण सुरक्षा प्रदान करण्याचा तृणमूलची इच्छा आहे. गोवेकरांची मान नेहमी उंचावून, सन्मानानं जगावं ही आमची इच्छा आहे, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं.
माझ्या धर्माच्या आधारावर भाजपच्या कॅरेक्टर सर्टिफिकेटची मला गरज नाही. भाजपला हा अधिकारही नाही. मी एक अभिमानी हिंदू आहे, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपवर तीव्र शब्दांत टीका केली.
माझा धर्मनिरपेक्षतेवर विश्वास आहे. माझा एकात्मतेवर विश्वास आहे. भारत ही एकच मातृभूमी… जेवढी पश्चिम बंगाल ही माझी मातृभूमी आहे तेवढीच गोवा हीदेखील माझी मातृभूमी आहे, असं म्हणत ममतांनी एकात्मतेचं आवाहन केलं.
‘पश्चिम बंगालचं उदाहरण समोर ठेवताना, पश्चिम बंगाल हे मजबूत राज्य आहे. भविष्यात गोव्यालाही एक मजबूत राज्य म्हणून पाहण्याची आमची इच्छा आहे. गोव्यात एक नवी सकाळ आम्हाला पाहायचीय. कुणी तरी विचारत होतं की ममताजी गोव्यात काय करणार? का नाही, मी भारतीय आहे… कुठेही जाण्याचा मला अधिकार आहे तसा तो तुम्हालाही आहे’ असं म्हणत एका नव्या गोव्याचं स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांनी केला.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times