नवी दिल्लीः पीएमसी बँकेनंतर डबघाईला गेलेल्या येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने गुरुवारी निर्बंध आणले. आता या बँकेला पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाची पावलं उचलली आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन येस बँकेच्या खातेदारांना दिलासा दिला. सर्व खातेदारांचे पैसे सुरक्षित असल्याची ग्वाही सितारामन यांनी दिली. अशातच रिझर्व्ह बँकेनेहे येस बँकेच्या फेररचनेची घोषणा केली. नवी योजना येस बँक आणि एसबीआयला पाठवली आहे. त्यावर त्यांचे मत मागवले आहे, असं रिझर्व्ह बँकेने म्हटलंय.

एसबीआयने येस बँक खरेदी करण्याची तयारी दर्शवली आहे. एसबीआय या बँकेत पुढच्या तीन वर्षांपर्यंत ४९ टक्के आपली गुंतवणूक ठेऊ शकते. तर २६ टक्क्यांहून कमी गुंतवणूक करता येणार नाही. येस बँकेचे नवे संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर एसबीआय ती बँक ताब्यात घेईल, असं निर्मला सितारामन यांनी सांगितलं.

बँक कर्मचाऱ्यांची नोकरी एक वर्ष सुरक्षित

बँकेच्या कर्मचाऱ्यांची नोकली आणि पगार एक वर्षापर्यंत सुरक्षित असेल. ठेविदार आणि कर्जदारांवर त्याचा परिणाम होणार नाही, असं सितारामन म्हणाल्या. येस बँक डबघाईला का गेली? याचा तपास आरबीआय करणार आहे. यात कुणाचा व्यक्तिगत भूमिक होती, हे तपासलं जाणार आहे. पण अनिल अंबानी समूह, एस्सेल, डीएचएफएल, आईएलएसएफ आणि व्हिडाफोन या कंपन्यांना येस बँकेने कर्ज दिलं होतं. यामुळे येस बँक डबघाईला आल्याचं सितारामन यांनी सांगितलं.

२०१७ पासून रिझर्व्ह बँकेची नजर होती

येस बँकेच्या कारभारावर २०१७ पासून रिझर्व्ह बँकेने नजर ठेवली होती. प्रशासनातील प्रकरणं, नियमांचे पालन न होणं, बुडीत कर्जांचे वर्गीकरण करताना घोळ झाला आहे. तसंच बँकेची बुडीत कर्ज वाढली आहेत.

उद्योजक आणि व्यावसायिकांना वारेमाप कर्ज मंजूर करणाऱ्या येस बँकेच्या संकटाला बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना नेटीझन्सनी लक्ष्य केल आहे. नोटबंदीनंतर मोदी सरकारची तोंडभर स्तुती करणारे राणा कपूर सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले आहेत. दरम्यान, आपण १३ महिन्यांपूर्वी बँकेतून बाहेर पडलो असून या दरम्यान काय घडले याची आपल्याला कल्पना नाही असे सांगून राणा कपूर यांनी हात झटकले आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here