हायलाइट्स:

  • पोलिसांकडून ३७ ठिकाणी नमाजासाठी परवानगी
  • विरोधामुळे परिसरात तणावाचं वातावरण
  • ‘हिंदुत्व’वादी म्हणवणाऱ्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा समावेश

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीनजिक हरियाणाच्या गुरुग्राममध्ये शुक्रवारी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून सार्वजनिक ठिकाणी नमाजाला विरोध दर्शवण्यात आला. पोलिसांकडून शुक्रवारी एकूण ३७ ठिकाणी नमाजासाठी परवानगी देण्यात आली होती. याला विरोध करत हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी घातलेल्या गोंधळामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. जवळपास गेल्या पाच आठवड्यांपासून हा प्रकार सुरू आहे.

जुम्याच्या नमाजाच्या वेळी हिंदू संघटनेचे कार्यकर्ते नमाजाच्या ठिकाणी उपस्थित झाले आणि घोषणाबाजी करू लागले. यामुळे तणाव निर्माण झाल्यानं पोलिसांनी जवळपास ३० जणांना ताब्यात घेतलं.

Narendra Modi: ऐन दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर
Rajasthan: पाकिस्तान विजयावर लिहिलं ‘आम्ही जिंकलो’, शिक्षिकेवर ओढावलं दुहेरी संकट

गेल्या शुक्रवारीही, गुरुग्रामच्या सेक्टर १२ ए च्या एका खासगी स्थळावर नमाज अदा करणाऱ्या मुस्लिमांना विरोध करण्यात आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. ‘जय श्री राम’च्या घोषणा देत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी इथे गोंधळ घातला. त्यानंतर परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली होती. सुरक्षेत रॅपिड अॅक्शन फोर्सच्या सदस्यांनाही सहभागी करण्यात आलं होतं.

गेल्या आठवड्यात विरोध करणाऱ्यांत स्थानिक वकील आणि भाजपचे माजी नेते कुलभूषण भारद्वाज हेदेखील व्हिडिओत दिसले होते. भारद्वाज यांनी पोलिसांशी हुज्जतही घातली होती. द्वेषपूर्ण भाषण करण्याच्या आरोपाखाली गुडगाव पोलिसांनी अटक केलेल्या जामिया मिलिया शूटरचं भारद्वाज यांनी प्रतिनिधित्व केलं होतं.

गेल्या काही आठवड्यांपासून हरयाणाच्या सेक्टर ४७ मध्येही असंच विरोध प्रदर्शन होताना दिसून येत आहे.

Mamata Banerjee in Goa: ‘भाजपकडून कॅरेक्टर सर्टिफिकेटची गरज नाही’, ममता गोव्यात कडाडल्या
2G Spectrum Scam: बिनशर्त माफी, माजी CAG विनोद राय यांच्या माफीनाम्याचा संजय निरुपम यांच्याकडून स्वीकार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here