हायलाइट्स:

  • जामिनावर बाहेर पडल्यानंतर काय करतायत लालू यादव? पाहा…
  • खुर्चीवर बसून निवांतपणे आईसक्रीम खातान दिसले लालू
  • लालू प्रसाद यादव यांचा जुगाड सोशल मीडियावर चर्चेत

पाटणा : बहुचर्चित चारा घोटाळ्यातील दोषी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. सध्या ते काय करत आहेत? याची अनेकांना उत्सुकता आहे.

नुकतंच लालू प्रसाद यादव निवांतपणे खुर्चीवर बसून आईसक्रीम खाताना पाहण्यात आले.

तहाण लागल्यानं लालू प्रसाद यादव आईसक्रीम खाऊन तहाण भागवण्याचा प्रयत्न करत होते. याचं कारण म्हणजे, डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण दिवसात ५०० मिलीलीटरपेक्षा जास्त पाणी पिण्यास मनाई केलीय.

लालू प्रसाद यादव यांचा पाण्याची तहान आईसक्रीमवर भागवण्याचा हा जुगाड सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

सध्या, ७३ वर्षीय लालू प्रसाद यादव यांचं मूत्रपिंड योग्यरित्या काम करत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना संपूर्ण दिवसभरात कमीत कमी पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी राजद प्रमुख पाटणाच्या १० सर्क्युलर रोड स्थित पत्नी राबडी देवींच्या निवासस्थानी होते.

तहाण लागल्यानंतर त्यांनी आपल्या एका कर्मचाऱ्यालाच निवासस्थानाबाहेरच्या आईसक्रीम विक्रेत्याकडून एक नारंगी रंगाची आईसकॅन्डी घेऊन येण्याचे आदेश दिले.

यावेळी, राबडी देवींच्या निवासस्थानी बिहार विधान परिषदेतील आरजेडी विधान परिषद सदस्य सुनील सिंग हेदेखील उपस्थित होते. लालू प्रसाद यादव यांना लहान मुलाप्रमाणे आईसक्रीम खाताना पाहून त्यांनी लालूंचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले.

आपण लालूंना आईसकॅन्डी खाण्यास मनाई केली तेव्हा तहान भागवण्यासाठी आपल्याकडे दुसरा पर्याय नसल्याचं लालूंनी आपल्याला म्हटल्याचंही सुनील सिंह यांनी म्हटलंय. ‘सत्तू, भूंजा यांसारखे पारंपरिक व्यंजन लालूंना जेवणात पसंत आहेत. ते एक साधारण व्यक्ती आहेत. त्यांनी अनेक अडथळे पार केले आहेत. ते लवकरच ठिकठाक होतील’, अशी कामना सिंह यांनी व्यक्त केलीय.

लालू प्रसाद यादव यांना सध्या मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, युरिक ऍसिड वाढणे, किडनीचे आजार, किडनी स्टोन, थॅलेसेमिया (रक्त संबंधित रोग), मेंदूशी संबंधित आजार, उजव्या खांद्याच्या हाडाचा त्रास, पायाच्या हाडाचा त्रास, डोळ्यांचा त्रास, POST AVR (हृदयाशी संबंधित) अशा अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here