मुंबई: करोना काळात अनेक गोष्टींवर मर्यादा आल्या. अनेकांचे प्लॅन फसले. पण काही मराठी कलाकारांनी मात्र लॉकडाउन उघडताच आपल्या लग्नाची आनंदवार्ता चाहत्यांसोबत शेअर केली. अभिज्ञा भावे, मानसी नाईक, सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर, आस्ताद काळे,सोनाली कुलकर्णी, सई लोकूर आणि सुयश टिळक या कलाकारांनी विवाहबंधनात अडकणं अधिक पसंत केलं. आता आणखी एक अभिनेत्री नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.

‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. १८ ऑक्टोबर २०२१ रोजी रसिका आणि तिचा प्रियकर आदित्य बिलागी हे लग्न बंधनात अडकले. रसिका आणि आदित्यनं एक खास पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

गुरुनाथची शनाया लागलीये लग्नाच्या तयारीला, प्रिवेडिंग शूट पाहिलं का?
रसिका आणि आदित्यचं हे डेस्टीनेशन वेडींग होतं. दोघांचा विवाह गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये जवळचे कुटुंबिय आणि मित्र मैत्रिणी यांच्या उपस्थितीत गोव्यात पार पडला. फोटो शेअर करताच चाहते आणि सेलिब्रिटींकडून रसिका आणि आदित्य यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अशी झाली दोघांची भेट
‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेतून ब्रेक घेत रसिकाने थेट अमेरिका गाठली होती. तिथं तिनं सिनेमाशी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याच काळात तिनं काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये आदित्य बिलागीसोबतचे खूप सारे फोटो शेअर केले होते. अनेक फोटो हे अतिशय रोमँटिक अंदाजातील होते. त्यावरून ती रिलेशनमध्ये असल्याचा अंदाजही तिच्या चाहत्यांनी वर्तवला होता.Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here