नवी दिल्लीः नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून (सीएए) ईशान्य दिल्लीत दंगल उसळली होती. या प्रकरणी संसदेत गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी गोंधळ घालत चर्चेची मागणी लावून धरली होती. ही मागणी फेटाळून लावत सरकारने होळीनंतर चर्चा करू असं सांगितलं होतं. सरकारने आता चर्चेची तयारी दर्शवली आहे. दिल्लीतील दंगलीवर आता ११ मार्चला संसदेत चर्चा होणार आहे. या चर्चेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उत्तर देणार आहेत, असं आयएएनसने वृत्त दिलं आहे. दिल्ली दंगलीतील मृतांची संख्या ५३ वर गेली आहे.

संसदेत कुठलाही गोंधळ न घालता विरोधकांनी दिल्ली दंगलीच्या मुद्द्यावर चर्चा करावी. दंगलग्रस्त ईशान्य दिल्लीतील परिस्थिती आता नियंत्रणा आहे आणि तिथे शांतता आहे. यामुळे चर्चा करावी, असं विरोधी पक्षांनी म्हटलं. आता विरोधी पक्ष शांततेत चर्चा करेल अशी आमची आपेक्षा आहे, असं संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं.

दिल्लीतील दंगलीवरून लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या सात खासदारां ३ एप्रिलपर्यंत निलंबित करण्यात आलंय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बुधवारी त्यांना निलंबित केलं होतं. खासदारांच्या या निलंबनानंतर दिल्लीतील दंगलीवर चर्चेची तारीख निश्चित झाली.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला आठवडा दिल्लीतील दंगलीच्या मुद्द्यावरून गोंधळात गेला. लोकसभेत आजही विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचं कामकाज तहकूब ११ मार्चपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेचं कामकाजही गोंधळामुळे ११ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आलंय. पण दोन ते पाच मार्चदरम्यान लोकसभेत झालेल्या गोंधळाची चौकशी करण्यात येणार आहे. लोकसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी केली जाणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here