खेड : खेड तालुक्यात आस्तान ग्रामपंचायतीमध्ये १४ व्या वित्त आयोगाच्या तब्बल ८ लाख २४ हजार ७३० रुपये निधी गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे.

खेड पंचायत समितीचे विस्तार अधिकारी शरद साहेबराव भांड यांनी चौकशीअंती खेड पोलीस ठाण्यात या कथित गैरव्यवहार प्रकरणी शुक्रवारी रात्री उशीरा फिर्याद दाखल केली. याप्रकरणी संशयित आरोपी ग्रामपंचायत आस्तान येथील ग्रामसेवक शशिकांत शंकर जाधव (मूळ रा. वीर, बौद्धवाडी ता. चिपळूण, जि. रत्नागिरी), तत्कालीन सरपंच दीपक जगन्नाथ मोरे (रा. सवनस ता. खेड, जि. रत्नागिरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! किरकोळ वादातून दोघांचा खून; हत्याकांडाने तालुका हादरला

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांवरही आस्तान ग्रामपंचायतीत सन २०१७-१८,२०१९-२०२० या आर्थिक वर्षात या निधी वापरात अनियमितता करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणी संशयित आरोपी आस्तान ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व आस्तान ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून काम करत असताना त्यांनी एकमेकांच्या संगनमताने व सहाय्याने १४ व्या वित्त आयोगाची मंजूर रक्कम व ग्रामनिधीची रक्कम मिळून ८ लाख २४ हजार ७३० रुपये इतक्या रक्कमेच्या कामामध्ये अनियमितता करून आरोपींनी रक्कम स्वत:च्या नावे काढून अपहार केली. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हिंगे हे करत आहेत.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here