हायलाइट्स:

  • कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे दुहेरी खून
  • किरकोळ मारहाणीच्या प्रकरणातून घडली घटना
  • कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल

सांगली : किरकोळ मारहाणीच्या प्रकरणातून कडेगाव तालुक्यातील विहापूर येथे दुहेरी खुनाची (Sangali Double खून प्रकरण ) घटना घडली. मारामारीत संदीप भानुदास चव्हाण (वय ३४) आणि विजय नानासाहेब माने (वय ३५, दोघे रा. विहापूर) या दोघांचा खून झाला. तसंच गणेश सतीश कोळी (वय-२६) व गोरख महादेव कावरे (वय-३०,दोघे रा.विहापूर) हे जखमी झाले आहेत.

याप्रकरणी मधुकर उत्तम मोरे (वय-२८) व विशाल तानाजी चव्हाण (वय-२९दोघे रा.विहापूर) यांच्याविरोधात कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी संशयित आरोपी मधुकर मोरे याला अटक केली आहे, तर विशाल चव्हाण हा फरार आहे. ही घटना शुक्रवारी (ता. २९ ) रात्री उशिरा घडली असून, या दुहेरी खून प्रकरणाने तालुका हादरला आहे.

यात्रेसाठी चालत जाणाऱ्या भाविकांना कारने चिरडले; ३ जागीच ठार

कडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विहापूर येथील गणेश सतीश कोळी, गोरख महादेव कावरे व विजय नानासाहेब माने यांनी शुक्रवारी (ता.२९) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरुन या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर मोरे याचे वडील उत्तम मोरे यांना मारहाण केली होती. हीच मारहाण दोघांच्या जीवावर बेतली. गणेश, विजय व गोरख या तिघांनी मिळून आपल्या वडिलांना मारहाण केल्याची माहिती मधुकर मोरे याला मिळाली. त्यामुळे संतापलेल्या मधुकर याने आपला मित्र विशाल चव्हाण याला सोबत घेऊन विजय माने, गणेश कोळी, गोरख कावरे यांना लाकडी दांडके, काठी व ऊसाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तर विजय, गणेश व गोरख या तिघांचा मित्र असलेला संदीप चव्हाण याला त्याच्या घरातून बाहेर बोलवून घेतले व संशयित मधुकर मोरे व विशाल चव्हाण या दोघांनी त्याला लाकडी दांडके, काठी व ऊसाने मारहाण करुन गंभीर जखमी केले.

nawab malik tweets new photo: ‘या व्यक्तीचे वानखेडेंशी नाते काय’?; एक फोटो ट्विट करत नवाब मलिकांचा सवाल

मारहाणीत मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने संदीप चव्हाण यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर विजय माने हेही गंभीर जखमी झाल्याने नातेवाईकांनी त्यांना सांगली येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

या खून प्रकरणाची माहिती मिळताच कडेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे व सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांच्यासह पोलीस पथकाने विहापूर येथे घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. तसंच या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी मधुकर उत्तम मोरे यांच्या मुसक्या आवळल्या, तर दुसरा संशयित आरोपी विशाल तानाजी चव्हाण यांच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना केली. या खून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे हे करत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here