अकोला: अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात राष्ट्रवादी युवा काँग्रेसने एक अनोखे आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसापासून अकोट शहरातील अनेक प्रमुख रस्त्यावर खड्डे निर्माण झालेले आहेत़. त्यामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे खड्डे बूजवीन्यात यावे. नागरिकांना रस्ते सुविधा नगर पालिकेने द्यावी या साठी आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने खड्डा तेथे दिवा लावून खड्डे समस्यांवर प्रकाश टाकला.

दिवाळी पूर्वीच शहरातील प्रमुख मार्गावरील खड्ड्यावर दिवे लावून राष्ट्रवादी युवा काँग्रेसने अनोखे आंदोलन केले. गेल्या अनेक दिवसापासून शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत़. या खड्ड्यामुळे वाहनधारकांना व पादचारी नागरिकांना याचा नाहक त्रास सहन होत आहे. अनेकदा वाहनधारकांचे अपघात झाले व होत अजूनही आहेत़. त्यामुळे शारीरिक इजा होऊन वाहनाचे नुकसान झाले आहे. शहरातील मार्गांवर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत , या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत . त्यामुळे घराच्या बाहेर निघताना आणि बाहेरून घरी जाताना आपण सलामत राहू की नाही याची शाश्वती राहिलेली नाही.

नगरपरिषदेने गेल्या अनेक वर्षांच्या कार्यकाळात अजूनही अनेक रस्त्यांची खड्डे समस्या मिटवली नाही. या खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांच्या संतप्त भावना लक्षात घेता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आजचे आंदोलन जनहितासाठी केले असे यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष राम म्हैसने यांनी सांगितले आहे. शहरातील जिजामाता चौक येथून प्रारंभ झालेले हे दिवे लावा आंदोलन शिवाजी चौक, सोनू चौक मार्गे नरसिंह रोड या रस्त्यांवर करण्यात आले.
पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला: अनेक जण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू
या आंदोलनामुळे एक दिवा रस्त्यावरील खड्ड्यांसाठी शहराच्या विकासासाठी असे चित्र रस्त्यांवर दिसून आल्यामुळे नगर परिषदेची उदासीनता दूर होईल अशी अपेक्षा नागरीकाना आहे. मात्र अनेक दिवसांपासून नगरपरिषदेला हे खड्डे दिसत नाहीत का…? असाही प्रश्न नागरिकांना पडला आहे. रस्त्यांचे स्वरूप बदलावे सुविधांनी युक्त रस्ते नागरिकांना मिळावे हाच आजच्या आंदोलनाच्या मागचा उद्देश दिसून आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने याबाबत पुढाकार घेतलेला आहे. या आंदोलनानंतर प्रशासनाच्या डोळ्यात उजेड पडावा रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात यावे एवढीच आमची अपेक्षा आहे. त्यासाठीच राष्ट्रवादी युवक काँग्रेस सदैव तत्पर राहील असेही राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे अकोट तालुका अध्यक्ष राम म्हैसने यांनी यावेळी म्हटले आहे.

आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे, विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी, जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ मोहोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस चे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here