मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर सध्या मुंबईत गर्दी पाहायला मिळते. अशात मुंबईतल्या कांजुर मार्ग भागात ब्रिजवर मोठा अपघात झाल्याची घटना समोर येत आहे. चार गाड्या एकमेकांना एका मागोमाग धडकल्यामुळे हा भीषण अपघात घडला. यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, पोलीस आणि मदतकार्य घटनास्थळी दाखल झाले असून अपघाती वाहनांना रस्त्याच्याकडेला नेण्याचं काम सुरू आहे. तर वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी ही पोलिस काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times