पुणे : सिंहगड रस्त्यावरील हिंगणे परिसरात ७० वर्षीय महिलेचा खून करून घरातून पावणे दोन लाखांचे दागिने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे येथे घरात घुसलेल्या चोरट्यानी ७० वर्षीय महिलेचा खून करून पावणेदोन लाख रुपयांचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शालिनी बबन सोनावणे (वय ७०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत घडला आहे.
महिला बँक अधिकाऱ्याने केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहलेली नावं वाचून पोलिसही हादरले
सोनावणे या घरात एकट्याच राहत होत्या. तर, त्यांच्या समोरील सोसायटीत त्यांचा मुलगा राहत होता. मुलगा रात्री आईकडे आला, तेव्हा हा प्रकार उघड झाला. मुलानेदिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातून कपाटात ठेवलेली रोख रक्कम आणि सोने चोरून नेले आहे. मात्र, सोनावणे यांच्या अंगावरील चार ते पाच तोळे सोने तसेच आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here