हायलाइट्स:
- zee marathi awardvar नेटकरी संतापले
- भावी सुनेसाठी प्रेक्षकांनी दिली आदितीला पसंती
- सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी व्यक्त केला रोष
संकटात अडकलेल्या मित्राच्या मदतीला धावली जुही चावला; २८ वर्षांपासून आहे अतूट मैत्रीचे नातं
या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट वडिलांचा पुरस्कार देशपांडे सरांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार नेहाला देण्यात आला. यानंतर सर्वोत्कृष्ट भावी सासरे हा पुरस्कार दादा साळवी म्हणजेच स्वीटूच्या बाबांना आणि सर्वोत्कृष्ट भावी सासू हा पुरस्कार शकू म्हणजे ओमच्या आईला देण्यात आला. मात्र हे पुरस्कार योग्य व्यक्तीला दिले नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. सर्वोत्कृष्ट भावी सासरे या भूमिकेसाठी दादा साळवी यांच्या ऐवजी प्रेक्षकांनी ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ‘ मधील सिद्धार्थच्या बाबांना आणि ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील यशच्या आजोबांना पसंती दर्शवली होती. तर सर्वोत्कृष्ट सासू हा पुरस्कार प्रेक्षकांच्या मते सिद्धार्थच्या आईला मिळायला हवा होता.

याशिवाय सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार स्वीटूला देण्यात आला. मात्र प्रेक्षकांनी स्वीटू नक्की कोणाची सून आहे ते स्पष्ट नसताना तिला सुनेचा पुरस्कार कसा, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तर या पुरस्कारासाठी प्रेक्षकांनी आदिती आणि नेहा यांना योग्य सांगितलं आहे. नेटकऱ्यांच्या मते आदिती उत्कृष्ट सून बनू शकत असताना स्वीटूला हा पुरस्कार देणं चुकीचं आहे. नेटकऱ्यांनी निरनिराळ्या प्रतिक्रिया त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. यासोबत सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून मृण्मयी देशपांडे हिला देण्यात आलेल्या पुरस्कारावरही प्रेक्षक नाराज आहेत.

BBM3: वाईल्ड कार्डद्वारे छोट्या पडद्यावरील ही अभिनेत्री करणार बिग बॉसच्या घरात प्रवेश
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times