यवतमाळ : यवतमाळच्या झरी तालुक्यातील मुकुटबन येथून तीन किमी अंतरावरील खडकी गावाजवळ असलेल्या रेल्वे गेटच्या जवळील शेतात एका मजुरांचा सोयाबीन काढत असतांना मशीनमध्ये पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या अपघाताचा एक फोटोही समोर आला आहे. हा फोटो पाहूनच अंगावर शहारे येतील.

चंद्रपूर जिल्ह्यातील विलास भूदाजी तोडासे वय अंदाजे ५५ वर्ष रा भाटाडी ता. पोंडूर्ण असे जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन काढणाऱ्या मजुराची गॅंग झरी तालुक्यात आली आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन मशीनमधून काढून देण्याचे काम सुरू असताना ही घटना घडली.

मुंबई चार गाड्यांचा भीषण अपघात, एकामागोमाग धडकल्याने कांजुर मार्गवर वाहतूक कोंडी
दिवाळी तोंडावर आल्याने मजूर आज सर्व कामे करून आपापल्या घरी जाण्याच्या तयारीत असतान अचानक मजूर विलास तोडासे यांचा सोयाबीन काढतांना अडकून पट्ट्यावर पडल्याने तो सरळ मशीनच्या आतमध्ये कॅमरेपर्यंत गेल्याने अर्धे शरीर छिंनविच्छिन्न झाले व त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघाताची माहिती खडकी, मुकुटबन, गणेशपूर व अडेगावपर्यंत वाऱ्यासारखी पसरताच हजारो लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती.

Mumbai Local Train: मुंबई लोकलचं तिकीट केव्हापासून?; राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here