ABP Majha Diwali Ank :एबीपी माझा’चा पहिला वहिला दिवाळी अर्थात ‘माझा’ दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झाला. अनेक दिग्गजांच्या लेखांनी आणि साहित्याने नटलेल्या माझा दिवाळी अंकाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कौतुक केलं. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी हा अंक मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिला. त्यावेळी ‘माझा’चा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले आणि त्यांनी या अंकाला शुभेच्छा दिल्या.

ABP Majha Diwali Ank 2021 : 'माझा दिवाळी अंका' चा उपक्रम कौतुकास्पद; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

एबीपी माझाच्या पहिल्या-वहिल्या दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा 30 ऑक्टोबर रोजी पार पडला. या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी शिक्षणतज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ. स्नेहलता देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, अभिनेत्री प्रतिक्षा लोणकर, ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर उपस्थित होते. एबीपी माझाच्या पहिल्या दिवाळी अंकाच्या निर्मिती आणि वितरणाची जबाबदारी ग्रथांलीने घेतली आहे. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत एबीपी माझाच्या पहिल्या दिवाळी अंकाचं प्रकाशन मोठ्या दिमाखात पार पडलं.

ABP Majha Diwali Ank 2021 : 'माझा दिवाळी अंका' चा उपक्रम कौतुकास्पद; मुख्यमंत्री ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

कसा आहे ‘माझा दिवाळी अंक’?
दिवाळी अंकात लेख, मुलाखत, अनुभव, परिसंवाद, कथा, कवितांची जशी चंगळ आहे. तसेच तुम्हा-आम्हाला जरा विचार करायला लावणारे, जगातील बदलांचीमाहिती देणारे लेखही आहेत. नागराज मंजुळेंवर अमिताभचा कसा प्रभाव आहे किंवा जागतिक दर्जावर मराठी सिनेमाला वैभव मिळवून देणाऱ्या चैतन्य ताम्हाणेचा मातीतील गोष्टीसांगण्यावर भर कसा आहे ते सांगणारे त्यांचे अनुभव आहेत. तसेच देशाला चांगल्यारस्त्यांने जोडण्याचे स्वप्नं पाहाणारे नीतिन गडकरी यांची सविस्तर मुलाखत तुम्हाला वाचायला मिळेल तर महाराष्ट्र कसा समृद्धीच्या महामार्गावर आहे त्याची इत्यंभूतमाहिती देणारा एबीपी माझाच्या टीमचा आलेखही आहे. पी. साईनाथ यांचा विषमतेचे जागतिकीकरण हा लेख किंवा सुहास पळशीकरांचाअस्वस्थता हा लेख, चंद्रकांत कुलकर्णींचं आतडं वाड्यात का अडकलंय ते सांगणारा लेख ही या दिवाळीअंकाची वैशिष्ट्यं आहेत. सानिया, प्रवीण बांदेकर, राजीव तांबे यांचे लेखसौमित्र, संदीप खरे, दादू वैद्य, नागराज मंजुळे, गार्गी कुलकर्णी, संग्राम हजारे अशा नव्या जुन्यांचा समावेश असलेल्या कवींच्या कविता यांनी हा अंक नटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here