द्वारे लेखक म. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाईम्स | अपडेट केले: 1 नोव्हेंबर 2021, सकाळी 7:36
नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोतील (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्या भवितव्याचा निर्णय तपास संस्थेच्या महासंचालकांच्याच हाती आहे. यासंबंधी चौकशीसाठी आलेले दक्षता पथक दिल्लीला रवाना झाल्यानंतर आता एनसीबी मुंबईचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात तणावपूर्ण शांतता आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अधिकारी समीर वानखडे यांच्या भवितव्याचा निर्णय तपास संस्थेच्या महासंचालकांच्याच हाती आहे. यासंबंधी चौकशीसाठी आलेले दक्षता पथक दिल्लीला रवाना झाल्यानंतर आता एनसीबी मुंबईचे अधिकारी व कर्मचारी यांच्यात तणावपूर्ण शांतता आहे.
वानखेडे यांनी आर्यन खानच्या अटक प्रकरणात किरण गोसावी या साक्षीदारामार्फत २५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप या प्रकरणातील अन्य साक्षीदार प्रभाकर सैल यांनी केला होता. असा आरोप करणारे शपथपत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एनसीबी मुख्यालयाने पाच जणांचे दक्षता पथक तातडीने मुंबईला धाडले. या पथकाने वानखेडे यांची चौकशी केली. चार अधिकारी आणि अन्य तिघांचा जबाब नोंदवला. वानखेडे यांच्यावर आरोप करणाऱ्या प्रभाकर सैल यांना वारंवार विनंती करूनही ते चौकशीसाठी किंवा माहिती देण्यासाठी या दक्षता पथकासमोर आले नाहीत. त्यामुळे हे पथक सैल यांच्या चौकशीविना शनिवारी दिल्लीला परतले; पण त्यानंतर आता सध्या एनसीबी मुंबईत शांतता आहे. ‘दिल्लीहून कायम निरोप किंवा पत्र येते, याकडेच आता लक्ष आहे,’ असे कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
वेब शीर्षक: वानखेडे यांचा निर्णय महासंचालकांच्या हातात आहे
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times