औरंगाबाद : तुळजापुर नगर परिषदेचे १४ नगरसेवकांना ६ वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले आहेत. यात विद्यमान नगराध्यक्षासह १३ नगरसेवकांना निलंबित केल आहे. जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहिर केलं आहे. उस्मानाबाद जिल्हा पक्ष निरिक्षक रमेश बारसकर, राहुल मोटे, जीवन गोरे, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांनी तालुका तसेच जिल्हा पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.
विद्यमान नगराध्यक्ष सचिन रोचकरी, अर्चना विनोद गंगणे, विनोद ( पिटु ) गंगणे, हेमा औदुबर कदम, पंडित जगदाळे, किशोर साठे, चंद्रकांत कणे, मंजुषा प्रसाद देशमाने, आशाताई विनोद पलंगे, विजय कंदले, रेश्मा अविनाश गंगणे, वैशाली तानाजी कदम, भारती नारायण गवळी, अश्विनी विशाल रोचकरी याचे निलंबन राष्ट्रवादी काँग्रेसने केलं आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times