हायलाइट्स:

  • मौजमस्तीसाठी कॉलगर्लला बोलावणे तरूणाला पडलं महागात
  • सोशल मीडियावरून तरूणानं साधला होता संपर्क
  • खिशातून नोटांचे बंडल काढणे तरुणाच्या अंगाशी आले
  • आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका तरुणाला मौजमस्तीसाठी ऑनलाइन कॉलगर्लला बोलावून घेणं महागात पडलं. कॉलगर्लसोबत आलेल्या दोघा जणांनी तरुणाचे अपहरण करून त्याच्याकडील एक लाख रुपये लुटून पोबारा केला.

जयपूरच्या महेश नगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. शनिवारी रात्री उशिरा बिकानेर येथे राहणाऱ्या भागीरथने सोशल मीडियाच्या माध्यमातून ऑनलाइन कॉल गर्ल बुक केली होती. मात्र, कॉलगर्लला घेऊन आलेल्या दोघा एजंटने भागीरथचे अपहरण केले.

नोटाचे बंडल दाखवणे तरुणाला पडले महागात

ऑनलाइन वेश्या बुक केल्यानंतर गोपालपुरा बायपासवर तिला घेऊन येण्याचे ठरले होते. दोघे जण कॉलगर्ल गोपालपुरा येथील बायपासवर पोहोचले. तेथे भागीरथ आधीपासूनच उभा होता. त्यावेळी दोघा जणांनी त्याच्याकडे ऑनलाइन पेमेंट करण्यास सांगितले. त्यावेळी भागीरथने ऑनलाइन पेमेंट करण्यास नकार दिला. त्यामुळे व्यवहार फिस्कटणार होता. त्यानंतर भागीरथने आपल्या खिशातून नोटांचे बंडल बाहेर काढले आणि रोख पैसे देणार असे सांगितले. त्यानंतर दोघा जणांनी भागीरथला उचलले आणि थेट कारमध्ये कोंबले. त्याचे अपहरण करून मानसरोवर येथील निर्जन ठिकाणी घेऊन गेले. त्याच्याकडील एक लाख रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर भागीरथला कारमधून बाहेर ढकलून दिले आणि पोबारा केला.

माथेफिरू जावई सासुरवाडीला गेला; पत्नीसोबत कडाक्याच्या भांडणानंतर केलं हादरवणारं कृत्य

सावध राहा!

भागीरथ याने सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉलगर्ल उपलब्ध करून देणाऱ्या पेजवरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. सोशल मीडियावर असे हजारो पेज आहेत. त्यावर मोबाइल क्रमांक आणि ठिकाण दिले जाते. अशाच पेजवरून कॉलगर्ल आणि त्यांच्याशी संबंधित एजंटशी संपर्क साधला जातो. भागीरथनेही अशाच प्रकारे संपर्क साधून कॉलगर्ल बुकिंग केली होती. मात्र, त्याला हे चांगलेच महागात पडले. तरुणांनी यापासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून केले जाते. दरम्यान, भागीरथ याने तक्रार केल्यानंतर महेश नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉलगर्ल आणि तिच्यासोबतच्या दोघा एजंटचा पोलीस शोध घेत आहेत.

ऑनलाईन पद्धतीने घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी फार्मसीच्या विद्यार्थ्याने केलं धक्कादायक कृत्य!

दहावीच्या विद्यार्थीनींच्या मोबाईलवर मैत्रिणीच्या नंबरवरुन अश्लील छायाचित्र; नंतर समोर आलं खरं

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here