हायलाइट्स:
- ऐन दिवाळीत पावसाची शक्यता
- ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याकडून इशारा
- महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पुढे तीन ते चार दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस
अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होऊ शकतो तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो असं पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आलं आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यामध्ये एक नोव्हेंबरपासून पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पुढे तीन ते चार दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर अशा जिल्ह्यांमध्ये दोन नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत शेतीची कामं करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
खरंतर, रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पेरणीला सुरुवात झाली पण अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जर पाऊस झाला तर रब्बीच्या पेरण्याही लांबणीवर जातील अशी शक्यता आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times