हायलाइट्स:
- ब्लॅकमेल करून तरुणीवर दोन वर्षे अत्याचार
- सांगलीतील इस्लामपूर परिसरातील धक्कादायक घटना
- बिर्याणीतून गुंगीचे औषध देऊन केले होते अत्याचार
- पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
इस्लामपूर पोलिसांनी अतुलला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. अतुलने तरुणीच्या घरी जाऊन तिला बिर्याणीतून गुंगीचे औषध दिले होते. बिर्याणी खाल्ल्यानंतर तरुणी बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केले. आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तो तिच्यावर अत्याचार करत होता, अशी माहिती तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे.
बिर्याणीत मिसळले गुंगीचे औषध
आरोपी हा तरूणीच्या घरी नेहमी येत-जात होता. ओळखीचा गैरफायदा घेत तो दोन वर्षांपूर्वी तरूणीच्या घरी गेला होता. त्यावेळी पीडिता घरात एकटी होती. आरोपीने तिच्यासाठी बिर्याणी आणली. बिर्याणीत गुंगीचे औषध मिसळले होते. पीडिता बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार करून केलेल्या दुष्कृत्याचा व्हिडिओही चित्रित केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. दोन वर्षांपासून तिच्यावर अत्याचार सुरू होते. अखेर या अत्याचारांना कंटाळून तरुणीने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. ते ऐकून तिच्या पालकांना धक्काच बसला. पालकांनी जाब विचारल्यानंतर तो त्यांनाही धमकावू लागला, अशी माहिती समोर आली आहे.
रुग्णवाहिकेने दोन दिवसांचं लेकरू आणि बाळंतीणीला अर्ध्या रस्त्यात सोडलं
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times