हायलाइट्स:

  • अमरावती जिल्हा पुन्हा हादरला
  • महिला आणि तरुणींवरील अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच
  • २० वर्षीय तरुणीवर २५ वर्षीय तरुणाने केले अत्याचार
  • तरुणीने पोलीस ठाणे गाठून केली तक्रार, आरोपी फरार

अमरावती:अमरावती जिल्हा हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. एका २० वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही.

अमरावती जिल्ह्यात महिला आणि तरुणींवरील अत्याचाराच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी पोलीस ठाण्याच्या परिसरात नुकतीच एक घटना घडली आहे. एका २० वर्षीय तरुणीवर तरुणाने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या तरुणीने पोलिसांत तक्रार केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. २५ वर्षीय तरुणाने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. त्याच्याविरोधात लोणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आरोपीने तरुणीला लग्नाच्या भूलथापा दिल्या होत्या. या भूलथापांना बळी पडलेल्या तरुणीवर त्याने वारंवार अत्याचार केले.

धावत्या एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक घटना; पतीसोबत प्रवास करणाऱ्या महिलेवर ओढवला भयानक प्रसंग

अखेर या तरुणाकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून पीडितेने लोणी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. आरोपी फरार असून, तो अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस या तरुणाचा कसून शोध घेत आहेत.

Uttar Pradesh: देशातील ४६ रेल्वे स्टेशन्स बॉम्बस्फोटात उडवण्याची धमकी, अलर्ट जारी

मुंबईत ‘सायको किलर’च्या अटकेनंतर ‘त्या’ घटनांचा पुन्हा तपास; हत्या होत्या की अपघात?

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here