जालना : लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार, ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्री.पुंडलिक हरी दानवे यांचे दि.०१.११.२०२१ रोजी, सकाळी १०.०० वाजता वयाच्या ९५ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण राजकारणातून हळहळ व्यक्त होत आहे.

एक प्रामाणिक देशभक्त, निष्कलंक माजी खासदार, महाराष्ट्रातील व देशातील जुनं जाणतं तत्वनिष्ठ राजकीय व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेलं. सोमवारी सकाळी दहा वाजता निधन झाले. त्यांच्यावर मंगळवारी दोन नोव्हेंबर रोजी दुपारी मूळगाव पिंपळगाव (सुतार) (ता.भोकरदन जि.जालना ) येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे तीन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

नागरिकांनो! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या महत्त्वाच्या सूचना, दिवाळी साजरी करण्याआधी व्हा अलर्ट

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here