ट्विटर युजर Sanjit Sarkar ने एक ग्राफिक कार्ड शेअर केले आहे. ज्यात एक अल्पवयीन मुलीचा फोटो आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना टॅग करून लिहिलेय, भारताचे गृहमंत्री अमित शहा हे सांगितील की, दिल्लीत हिंदू मुली सुरक्षित का नाही?, ग्राफिक कार्डवर हेही लिहिले की, मुलीचे नाव ज्योती पाटीदार आहे.
ट्विटचा
पाहा
खरं काय आहे?
ज्योती पाटीदार, ज्या मुलीचा फोटो चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे. ही मुलगी मध्य प्रदेशातील परसुलियाकला गावची रहिवासी आहे. या मुलीचा मृतदेह २० फेब्रुवारी २०२० रोजी म्हणजेच सुरू होण्याच्या ३ दिवस आधी तिच्या घरात आढळला होता.
कशी केली पडताळणी?
ट्विटर युजरने जो फोटो शेअर केला आहे. त्या फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर आम्हाला दैनिक भास्करच्या वेबसाइटवर २१ फेब्रुवारी २०२० रोजी प्रकाशीत झालेली एक
मिळाली. या बातमीनुसार, जळालेल्या मुलीचे नाव ज्योती पाटीदार आहे. तिचा मृतदेह मध्य प्रदेशातील परसुलियाकला गावातून तिच्या घरात आढळला होता. या बातमीत हा फोटो वापरला होता. तो आता चुकीच्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
रिपोर्टनुसार, ज्योती १२ वीत शिकत होती. तिने आत्महत्या केली का, या बाजुने पोलिस तपास करीत आहे. तर लवकरात लवकर तपास करण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. ज्योती एकटीच घरी होती. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.
निष्कर्ष
मध्य प्रदेशातील १२ वीची विद्यार्थिनी असलेल्या ज्योती पाटीदार चा फोटो सोशल मीडियावर चुकीच्या पद्धतीने शेअर केला जात आहे. आम आदमी पार्टीचे निलंबित ताहिर हुसैन यांच्या समर्थकांनी दिल्ली हिंसाचार दरम्यान या मुलीवर रेप करून तिची हत्या केल्याचा दावा सपशेल खोटा आहे, असे मटा फॅक्ट चेकच्या पडताळणीत स्पष्ट झाले आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times