maharashtra diwali vacation 2021: नागरिकांनो! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या महत्त्वाच्या सूचना, दिवाळी साजरी करण्याआधी व्हा अलर्ट – health minister rajesh tope appealed to the citizens to celebrate diwali with awareness
जालना : करोना पाठोपाठ म्युकर मायकोसिसचे रुग्ण राज्यात नियंत्रणात आले आहे. ही गौरवास्पद बाब असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ते जालन्यात बोलत होते. म्युकरमायकोसिस रुग्णांसाठी महागडी औषधं मोफत केली असून ट्रीटमेंट चांगली देण्यात आल्याचा हा परीणाम असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. पण यावेळी बोलताना त्यांनी जनतेला एक महत्त्वाची सूचनाही दिली आहे. ज्याचं पालन न झाल्यास करोनाचा धोका पुन्हा वाढण्याची शक्यता असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
दुसरा डोस घेतलेल्या नागरीकांना रेल्वे खुली करण्यात आली आहे. मात्र, रेल्वेच्या जनरल डब्यात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना तिकीट देता येणार नसल्याने प्रवाशांची नाराजी आहे. याबाबत देखील आरोग्य मंत्र्यांनी भाष्य केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेकडे राज्य शासनाकडून या संदर्भात विनंती जरूर केली जाईल या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील असंही टोपे म्हणाले. है तैयार हम… फडणवीसांचं आव्हान नवाब मलिक यांनी स्वीकारलं! दुसऱ्या डोसकडे राज्यातील ७५ लाख नागरीकांनी पाठ फिरवली असून नागरीकांनी दुसरा डोस घेण्याचं आवाहन टोपे यांनी केलं आहे. या संदर्भात आरोग्य विभागाकडून कारवाई करून अशा नागरीकांना दुसरा डोस दिला जाईल असंही ते म्हणाले. राज्यात चिकन गूनियाचे रूग्ण वाढले आहेत. या संदर्भात आरोग्य विभागाकडून योग्य उपाययोजना केल्या जात असल्याच देखील टोपे यांनी म्हटलं आहे.