सोलापूर : संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला सोलापूरात भारतीय जनता पार्टीचे सर्वच नगरसेवक आणि माजी परिवहन राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. यावेळी नगरसेवकांनी आंदोलनस्थळी बसत कर्मचाऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. सोमवारी पाठिंब्याचे पत्र महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील, परिवहन सभापती जय साळुंखे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती कल्पना कारभारी आणि नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती देण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रातून नागरीकांना परगावी प्रवास करण्याकरिता जी प्रवास सेवा दिली जाते. त्यामध्ये मोठया प्रमाणावर महाराष्ट्र राज्यातील एसटी कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. आज आपले हे एसटी कामगार यांनी जर सेवा देणे बंद केले तर नागरीकांचे हाल बेहाल होऊ नये म्हणून ते सर्व सेवक प्रामाणिकपणे रात्रंदिवस व आपल्या कुटुंबाचा तसेच प्रकृतीचा विचार न करता अविरत सेवा देत असतात.
… म्हणून अनिल देशमुख ईडी कार्यालयात हजर झाले; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण
तेव्हा या सेवेपोटी त्यांना देण्यात येणारे वेतन हे अतिशय तुटपुंजे असून महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देणे क्रमप्राप्त व गरजेचे आहे. असे असताना त्यांना अतिशय कमी वेतन दिले जाणे म्हणजे त्यांचावर अन्यायच होत असल्याचे मत सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृहनेते शिवानंद पाटील व नगरसेवक डॉ. किरण देशमुख यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळावा, ८/१६/२४ टक्के वेतनवाढ तसेच सण, उच्चल म्हणून १२५००/- रुपये, वेतनवाढ, घरभाडे मिळावे, दिवाळी भेट म्हणून रु.१५०००/- सानुग्रह अनुदान मिळावे आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनास आता भाजपने बळ दिलं आहे. जोपर्यंत महाराष्ट्र शासनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे विलिणीकरण होणार नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवू असा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी बोलताना दिला.

नागरिकांनो! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या महत्त्वाच्या सूचना, दिवाळी साजरी करण्याआधी व्हा अलर्ट

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here