हायलाइट्स:
- पाकिस्तानात हिंदू मंदिरांना केले जातेय टार्गेट
- चोरट्यांनी प्राचीन हिंदू मंदिरातील दागिने आणि रोकड केली लंपास
- मुकुट, हार आदींसह हजारोंची रोकड केली लंपास
- सिंध प्रांतातील सरकारनेही घेतली दखल
सिंध प्रांताच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानंही या घटनेची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री मुराद अली शाह यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. चोरट्यांनी मंदिराच्या छतावरून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर मूर्तींवरील दागिने, मुकुट आणि हार आदींसह दानपेट्यांमधील रोकड लंपास केली. चोरी गेलेला हार १० तोळे वजनाचा होता, अशी माहिती पुजाऱ्यांनी दिली.
चांदीचे तीन हार आणि हजारोंची रोकड लांबवली
पुजाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मंदिरातून चांदीचे तीन हार आणि २५ हजार रुपये रोख चोरीला गेली. वरिष्ठ पोलीस अधीक्षक जावेद बलूच यांनी सांगितले की, मंदिर व्यवस्थापनाने मंदिराच्या परिसरातीलच एका व्यक्तीवर संशय व्यक्त केला होता.
दरम्यान, पाकिस्तानातील राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष चेला राम केवलानी आणि सिंध येथील अल्पसंख्याक मंत्री ज्ञानचंद इसरानी यांनी या घटनेप्रकरणी एफआयआर दाखल करून आरोपींना तातडीने पकडण्यात यावे, अशा सूचना केल्या आहेत. हिंदू सणांच्या काळात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. त्या निंदनीय आहेत. जिल्ह्यातील सर्व मंदिरांची सुरक्षा व्यवस्था कडेकोट करावी, असेही त्यांनी आदेश दिले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times