वृत्तसंस्था, नवी दिल्ली

‘देशात फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणता येणार नाही; परंतु त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीची यंत्रणा अधिक मजबूत करावी लागेल,’ असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पश्चिम बंगालमध्ये कालीपूजा, दिवाळी व अन्य सणांमध्ये यंदा फटाक्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला.

न्या. ए. एम. खानवीलकर आणि अजय रस्तोगी यांच्या विशेष खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल केला. मात्र, प्रतिबंधित फटाके आणि संबंधित वस्तू राज्यात आयात केल्या जाणार नाहीत, याची प्रवेशद्वांवरच खात्री करण्याचे निर्देश पश्चिम बंगाल सरकारला दिले. दिवाळीच्या सुट्टीदरम्यानच्या प्रकरणांवर सुनावणीसाठी या खंडपीठाची नियुक्ती करण्यात आली आहे.

करोनासंसर्गाच्या पार्श्वभूमीवर वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी राज्यात सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्री, वापर आणि खरेदीवर बंदी घालणाऱ्या उच्च न्यायालयाच्या २९ ऑक्टोबरच्या आदेशाविरोधातील याचिकांवर सुनावणीवेळी खंडपीठाने हा निर्देश दिला. या वर्षी कालीपूजा, दिवाळी, छठपूजा, जगधात्री पूजा, गुरूनानक जयंती आणि ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला कोणत्याही प्रकारच्या फटाक्यांचा वापर किंवा केले जाणार नाही याची काळजी राज्याने घ्यावी, असे उच्च न्यायालयाने आदेशात म्हटले होते; तसेच सण-उत्सवांत केवळ मेण किंवा तेलाचे दिवेच वापरावेत, असे त्यात नमूद केले होते.

priyanka gandhi arrest : प्रियांका गांधींना रात्रीच्या वेळी अटक; यूपीच्या ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
sameer wankhede : समीर वानखेडेंची दिल्लीत NCB मुख्यालयात साडेचार तास झाली कसून चौकशी

तमिळनाडून केवळ हरित फटाके

दरम्यान, राज्यात चार नोव्हेंबरला दीपावलीच्या दिवशी केवळ हरित फटाके फोडण्याची परवानगी देण्यात येत आहे, असे तमिळनाडू सरकारने सोमवारी स्पष्ट केले; तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फटाके फोडण्यासाठी दोन तासांचा कालावधी जाहीर केला. त्यानुसार सकाळी सहा ते सात आणि सायंकाळी सात ते आठ या वेळातच फटाके फोडता येणार असल्याचे पर्यावरण, हवामान बदल आणि वन विभागाने जारी केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण करणारे फटाके फोडणे टाळण्याचे आवाहनही सरकारने नागरिकांना केले आहे.

दिल्लीत फटाकेबंदी कायम

राजधानी दिल्लीत फटाके फोडण्यावर असलेली बंदी कायम राहील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये कालीपूजा, दिवाळी आणि अन्य सणांमध्ये फटाक्यांची विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदी घालणारा कोलकाता उच्च न्यायालयाचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर दिल्ली सरकारकडून ही माहिती देण्यात आली. दिल्लीतील हवेच्या अतिवाईट गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने दोन डिसेंबर २०२० रोजी सर्व प्रकारच्या फटाक्यांची विक्री आणि वापरावर पूर्णपणे बंदीचे निर्देश दिले होते.

बहिणीच्या पाठवणीची तयारी सुरू असतानाच भावाच्या हौतात्म्याची बातमी घरी पोहचली
‘चाट पे चर्चा’ : अखिलेश यांच्यासोबतचं विमान सोडून प्रियांकांसोबत RLD नेते चौधरी दिल्लीत

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here