हायलाइट्स:

  • मुंबईतील माहीम परिसरात थरार
  • पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरच चोराने केला हल्ल्याचा प्रयत्न
  • एकाच दिवशी दोन ठिकाणी केली होती चोरी
  • पोलिसांनी पाठलाग करून चोराला ठोकल्या बेड्या

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

सोनसाखळी चोराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर चोरानेच चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना माहीम परिसरात घडली. माहीम पोलिसांनी पाठलाग करून या चोराला अटक केली. या चोराने एका दिवशी दोन ठिकाणी सोनसाखळी चोरल्याने पोलिस त्याच्या मागावर होते.

माहीम परिसरात रविवारी दोन सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या. दोन्ही महिला तक्रारदारांनी वर्णन केल्यावरून एकच आरोपी असल्याचा पोलिसांचा संशय होता. पोलिसांनी दोन्ही घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका चोरानेच या दोन चोऱ्या केल्याचे दिसून आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास शिंदे यांच्या नेतृत्वात निरीक्षक दहातोंडे, सहायक निरीक्षक अतुल आव्हाड, उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत यांच्या पथकाने या चोराचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून माहिती तपासत या चोराचा माग घेतला जात होता. तपासादरम्यान हा चोर माहीमच्या प्रकाशनगर परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक या ठिकाणी पोहोचताच हा चोर पळ काढून लागला. आव्हाड यांनी त्याचा पाठलाग करून अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याने चाकू उगारला. चाकूचा धाक दाखवून पळण्याच्या तयारीत असलेल्या या चोराला पोलिसांनी चारही बाजूने घेरले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.

ड्रग्ज तस्करीचा पर्दाफाश; पोलिसांनी केला १०० किलोमीटरपर्यंत आरोपींचा पाठलाग

सोनसाखळी चोरीबरोबरच त्याच्यावर धमकी देणे, सरकारी कामात अडथळा अशा कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्याने चोरलेले मंगळसूत्र आणि सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली.

विकृतीचा कळस; ट्रेनमध्ये घुसून १७ प्रवाशांवर केले वार; अख्खा डबा दिला पेटवून

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here