महाराष्ट्रात ऑक्टोबर २०२० मध्ये १५ हजार ७९९ कोटींचं जीएसटी संकलन नोंदवण्यात आले होते. ऑक्टोबर २०२१ मध्ये हा आकडा १९ हजार ३५५ कोटींवर पोहचला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रानं एकूण २३ टक्क्यांची वाढ नोंदवली गेलीय.
त्याचप्रमाणे उत्तर प्रदेशात ऑक्टोबर २०२० मध्ये ५ हजार ४७१ कोटींचं जीएसटी संकलन नोंदवण्यात आले होते तर २०२१ मध्ये जीएसटी संकलन ६ हजार ७७५ कोटी नोंदविण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात उत्तर प्रदेशात एकूण २४ टक्क्यांची वाढ झाली आहे.
राज्यानुसार, ऑक्टोबर २०२१ जीएसटी संकलनाची आकडेवारी (कोटी रुपयांत)
राज्य | ऑक्टोबर २०२० | ऑक्टोबर २०२१ | वाढ |
महाराष्ट्र | १५,७९९ | १९,३५५ | २३% |
गुजरात | ६,७८७ | ८,४९७ | २५% |
कर्नाटक | ६,९९८ | ८,२५९ | १८% |
तामिळनाडू | ६,०१ | ७,६४२ | ११% |
उत्तर प्रदेश | ५,४७१ | ६,७७५ | २४% |
जम्मू आणि काश्मीर | ३७७ | ६४८ | ७२% |
हिमाचल प्रदेश | ६९१ | ६८९ | ०% |
पंजाब | १,३७६ | १,५९५ | १६% |
चंदीगड | १५२ | १५८ | ४% |
उत्तराखंड | १,२७२ | १,२५९ | -१% |
हरियाणा | ५,४३३ | ५,६०६ | ३% |
दिल्ली | ३,२११ | ४,०४५ | २६% |
राजस्थान | २,९६६ | ३,४२३ | १५% |
पूर्व भारतातील एक राज्य | १,०१० | १,३५१ | ३४% |
सिक्कीम | १७७ | २५७ | ४५% |
अरुणाचल प्रदेश | ९८ | ४७ | -५२% |
नागालँड | ३० | ३८ | ३०% |
मणिपूर | ४३ | ६४ | ४९% |
मिझोराम | ३२ | ३२ | १% |
त्रिपुरा | ५७ | ६७ | १७% |
मेघालय | ११७ | १४० | १९% |
आसाम | १,०१७ | १,४२५ | ४०% |
पश्चिम बंगाल | ३,७३८ | ४,२५९ | १४% |
झारखंड | १,७७१ | २,३७० | ३४% |
ओडिशा | २,४१९ | ३,५९३ | ४९% |
छत्तीसगड | १,९७४ | २,३९२ | २१% |
मध्य प्रदेश | २,४०३ | २,६६६ | ११% |
दमण आणि दीव | ७ | ० | -९९% |
दादरा आणि नगर हवेली | २८३ | २६९ | -५% |
गोवा | ३१० | ३१७ | ३% |
लक्षद्वीप | १ | २ | ८६% |
केरळ | १,६६५ | १९३२ | १६% |
पुद्दुचेरी | १६१ | १५२ | -६% |
अंदमान आणि निकोबार बेटे | १९ | २६ | ४०% |
तेलंगणा | ३,३८३ | ३,८५४ | १४% |
आंध्र प्रदेश | २,४८० | २,८७९ | १६% |
लडाख | १५ | १९ | ३२% |
इतर प्रदेश | ९१ | १३७ | ५१% |
केंद्र कार्यक्षेत्र | ११४ | १८९ | ६६% |
एकूण | ८०,८४८ | ९६,४३० | १९% |
1.30 लाख कोटा GST संकलन
ऑक्टोबर महिन्यात जीएसटीचे संकलन १.३० लाख कोटी रुपये झाले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने ही माहिती सोमवारी दिली. तत्पूर्वी, एप्रिल २०२१मध्ये १.४१ लाख कोटी रुपयांचे ‘जीएसटी’ उत्पन्न प्राप्त झाले होते. ‘जीएसटी’चे ऑक्टोबरमधील संकलन १ जुलै २०१७ नंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर झाले आहे. ऑक्टोबर २०२०मधील संकलनाशी तुलना केल्यास यंदाचे संकलन २४ टक्के अधिक आहे. ऑक्टोबरमधील एकूण ‘जीएसटी’ संकलन १,३०,१२७ कोटी रुपये आहे. यामध्ये केंद्रीय ‘जीएसटी’ (सीजीएसटी) २३,८६१ कोटी रुपये, राज्य ‘जीएसटी’ (एसजीएसटी) ३०,४२१ कोटी रुपये आणि इंटिग्रेटेड ‘जीएसटी’ ६७,३६१ कोटी रुपये संकलन झाले आहे. इंटिग्रेटेड ‘जीएसटी’मध्ये वस्तूंच्या आयातीवरील कराचा वाटा ३२,९९८ कोटी रुपये आहे. याशिवाय एकूण ‘जीएसटी’ संकलनामध्ये ८,४८४ कोटी रुपये उपकरांपोटी प्राप्त झाले आहेत. ‘जीएसटी’ संकलनात वाढ होणे हे अर्थव्यवस्था रुळांवर येत असल्याचे चिन्ह मानले जात आहे.
यंदा जूनमध्ये ९२,८४९ कोटी रुपयांचे, एप्रिल आणि मे महिन्यांत प्रत्येकी एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न ‘जीएसटी’तून प्राप्त झाले होते. करोनाचे घटलेले संक्रमण आणि लसीकरणाचा वाढलेला वेग यांमुळे देशातील सर्व क्षेत्रे उघडली आहेत. चित्रपटगृहांपासून ते जलतरण तलावांपर्यंत, शाळांपासून कॉलेजांपर्यंत सर्वच संस्था उघडल्या आहेत. त्यामुळेच अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आली आहे. त्यामुळे ‘जीएसटी’ उत्पन्नात वाढ नोंदविण्यात आली आहे.
चालू वर्षातील ‘जीएसटी’ उत्पन्न : महिना उत्पन्न (कोटी रुपयांत)
जानेवारी : १,२०,००
मार्च: १,२३,०००
मे : १,०२,७०९
जुलै : १,१६,३९३
सप्टेंबर : १,१७,०१०
ऑक्टोबर : १,३०,१२७
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times