हायलाइट्स:

  • ऑनलाइन जुगाराच्या आहारी गेलेल्या तरुणाची आत्महत्या
  • तीन महिन्यांत डोक्यावर झालं होतं लाखोंचे कर्ज
  • महिनाभरापासून तरूण होता तणावात
  • ट्रेनसमोर उडी घेऊन जीवन संपवले

राजगड (मध्य प्रदेश):

मध्य प्रदेशातील राजगढमध्ये ऑनलाइन गेम आहारी गेलेल्या एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. मानसिक तणावातून तरुणाने ट्रेनसमोर उडी घेऊन मृत्यूला कवटाळले. ऑनलाइन पत्ते खेळण्यासाठी त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते.

या तरुणाला ऑनलाइन पत्ते खेळण्याची लत लागली होती. यात तो जवळपास १० लाख रुपये हरला होता. त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या डोंगरामुळे तो तणावात होता. काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता, अशी माहिती समोर आली आहे. पडोनिया गावात ही घटना घडली होती. तरुणाचा मृतदेह रेल्वे रुळांशेजारी पडला होता. याबाबत स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. विनोद असे ३० वर्षीय तरुणाचे नाव आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. दुसरीकडे, चौकशीनंतरच याबाबत नेमके सांगता येईल, तोपर्यंत काही बोलणे योग्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली.

मुंबईत थरार! पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरच चोराने केला चाकूहल्ल्याचा प्रयत्न

ऑनलाइन जुगारात १० लाख रुपये गमावलेल्या विनोदला ओळखणाऱ्या काही जणांनी सांगितले की, तीन महिन्यांपासून तो ऑनलाइन जुगार खेळत होता. तो या जुगाराच्या आहारी गेला होता. पत्ते खेळण्यासाठी त्याने आजूबाजूच्या दुकानदारांकडून उसने पैसे घेतले होते. दुकानात बसून तो दिवसभर ऑनलाइन जुगार खेळायचा. मिळालेल्या माहितीनुसार, विनोद हा तीन बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. विनोदचं लग्न झालं होतं. त्याला दोन मुलेही आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कुटुंबातील इतर सदस्यांनी त्याचा जीव वाचवला होता. त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले होते. विनोदचे वडील हे मोठे शेतकरी आहेत. तसेच भोपाळ रोडलगत त्यांचा एक मोठा कॉम्प्लेक्स आहे. त्यात त्यांची सात ते आठ दुकाने आहेत. सर्व भाडे करारावर देण्यात आली आहेत. विनोद ते काम बघायचा. दिवसभर तो या ठिकाणी बसून ऑनलाइन जुगार खेळायचा तीन महिन्यांत तो १० लाख रुपये हरला होता. कर्जबाजारी झाल्याने तो गेल्या काही दिवसांपासून तणावात होता, अशी माहिती समजते.

पाकिस्तानातील प्राचीन हिंदू मंदिरं ‘टार्गेट’वर; चोरट्यांकडून दागदागिने, रोकडची लूट

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here