हायलाइट्स:

  • सोनसाखळी चोरी करणाऱ्या टोळीचा इंदूर पोलिसांनी केला पर्दाफाश
  • महागड्या वस्तू, गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी करायच्या चोऱ्या
  • एका घटनेनं पोलीस पोहोचले या अट्टल चोरट्यांपर्यंत
  • सात महिन्यांपूर्वीच जेलमधून सुटून आले होते बाहेर

इंदूर : दिवाळीच्या आधीच इंदूर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शहरातील अनेक भागांत दरोडा करणाऱ्या सोनसाखळी चोरांच्या (चेन स्नॅचर) टोळीतील पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, महागडे टॅटू, नशेची लत आणि गर्लफ्रेंडवर होणारा खर्च भागवण्यासाठी या सगळ्यांनी गैरमार्ग अवलंबला होता. दिवाळीच्या सणात ही टोळी शहरात आणखी चोऱ्या करण्याची शक्यता होती. मात्र, हीरानगर परिसरात घडलेल्या एका घटनेतून पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा मिळाला आणि हे सर्व जण जाळ्यात अडकले.

हीरानगर परिसरात अलीकडेच एका महिला शिक्षिकेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून अट्टल चोरटे पळ काढत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना पकडले होते. त्यांची चौकशी केली असता, पोलिसांना ठोस माहिती मिळाली. त्यावरून विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरी करणाऱ्या पाच अट्टल चोरांपर्यंत पोलीस पोहोचले.

म्हशींच्या तबेल्यात सुरू होता देहव्यापार; ‘त्या’ एका मेसेजने केला पर्दाफाश

पोलिसांनी सापळा रचून या अट्टल चोरट्यांना गजाआड केले आहे. इंदूर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अटक केलेले हे पाचही आरोपी महागडे टॅटू, नशेची लत आणि गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी हवे असलेले पैसे मिळवण्यासाठी सोनसाखळी चोरायचे, अशी माहिती तपासात उघड झाली आहे. या टोळीतील तीन जण हे बाणगंगा आणि दोघे जण एरोड्रम पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात. पाचही जण अट्टल चोरटे आहेत. इंदूर पूर्वचे पोलीस अधीक्षक आशुतोष बागरी यांनी सांगितले की, महागडे टॅटू काढून घेण्याचे, नशा करण्याची, मौजमस्ती करण्याची आणि गर्लफ्रेंडवर खर्च करण्यासाठी पैसा हवा होता. आणि तो मिळवण्यासाठी आरोपी सोनसाखळी चोरी करायचे. त्यासाठी ते महिलांवर पाळत ठेवायचे. त्यानंतर दुचाकीवरून येत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पसार व्हायचे. या चोरांपैकी एकाने तर अंगावर ८ हजार रुपये किंमतीचा टॅटू काढून घेतला होता. आता पोलीस त्यांच्या इतर साथीदारांच्या मागावर आहेत.

पुणे: दरोड्याच्या तयारीत होती टोळी, ज्वेलर्सचे दुकान होते टार्गेटवर; इतक्यात…

सात महिन्यांपूर्वीच जेलमधून बाहेर आले होते

सर्व आरोपी हे आधी मोबाइल चोरी करत होते. या प्रकरणांत त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. सात महिन्यांपूर्वीच ते सर्व जण जेलमधून सुटून बाहेर आले होते. त्यानंतर काही दिवस ते अंडरग्राउंड झाले होते. पण महागडे शौक पूर्ण करण्यासाठी त्यांनी सोनसाखळी चोरी सुरू केली. पोलिसांनी या सर्व आरोपींकडून चोरी केलेल्या १६ चेन जप्त केल्या आहेत. मध्यस्थांच्या मदतीने ते चोरी केलेल्या चेन ज्वेलर्सच्या दुकानात विकायचे. त्याचाही शोध सुरू आहे.

इंजिनीअर तरूण बनला अट्टल चोर; चोरीच्या पैशांतून घेतला अलिशान फ्लॅट आणि कार

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here