रत्नागिरी : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अटक हा महाविकास आघाडीला धक्का, हे धादांत खोटं असल्याची प्रतिक्रिया उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. यावेळी सामंत म्हणाले की, अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर पुढे काय करणार हे देखील त्यांच्या वकिलांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे एखादी एजन्सी एखादी कारवाई करत असताना किंवा त्यांच्या वकिलांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यावर त्यावर त्रयस्थ म्हणून मी बोलणं योग्य नाही असं सामंत यांनी म्हटलं आहे.

ही दिवाळी इतकी ऐतिहासिक दिवाळी आहे की महाराष्ट्रात फटाक्यांची विक्री करायची देखील आवश्यकता नाही अशी महाराष्ट्रात परिस्थिती आहे. कोण लवंग्या लावतोय, कोण बॉम्ब लावतोय, त्यामुळे ही दिवाळी अतिशय मनोरंजनाची होत असल्याचं यावेळी सामंत म्हणाले.

मुंबई क्रुझ प्रकरणः काँग्रेसने भाजपवर केला धक्कादायक आरोप
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना अखेर सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. देशमुख यांची सोमवारी १३ तास ईडीकडून चौकशी सुरू होती. या चौकशीनंतर अखेर रात्री उशिरा देशमुख यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले अनिल देशमुख हे सोमवारी प्रथमच समोर आले आणि सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी देशमुख यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित होते. दिवसभर अनिल देशमुख यांची चौकशी झाली आणि सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दिल्लीतील काही अधिकारी ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यानंतर पुन्हा देशमुख यांची चौकशी झाली आणि अखेर रात्री उशिरा त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

इतरांच्या आयाबहिणी महिला नाहीत का?; नवाब मलिक यांचा फडणवीसांना बोचरा सवाल

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here