मुंबई: यांच्या कीर्तनाचे काही व्हिडिओ मी पाहिले आहेत. त्यात ते महिलांना काही प्रमाणात कमी लेखत असल्याचं दिसून आलं. त्यांच्याबद्दल मला खूप आदर आहे. पण त्यांनी महिलांचा आदर कमी होईल, अशी विधानं करू नये, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांनी दिला.

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमृता फडणवीस यांनी इंदोरीकर महाराजांच्या वादग्रस्त विधानावर भाष्य केलं. मला इंदोरीकर महाराजांबद्दल आदर आहे. त्यांनी दिलेले सल्ले जीवनात उपयोगी पडतात, असं सांगतानाच लोकांवर प्रभाव पाडणाऱ्या लोकांनी आपल्या मतांचा लोकांवर अधिक प्रभाव पडतो, याचं भान ठेवायला हवं, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

यावेळी त्यांनी विविध विषयांवर चौफेर मतं मांडली. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात महिला मुख्यमंत्री होण्याचं पोटेन्शियल असल्याचं त्या म्हणाल्या. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या टीकेवर ठाम असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्रीपदी असताना देवेंद्र फडणवीस यांनी महिला सक्षमीकरणासाठी प्रचंड काम केलं आहे. अशा व्यक्तिला महिलांची माफी मागायला लावण्याची आदित्य यांची कृती योग्य नव्हती. मनाला पटणारी नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी यांची त्यांनी यावेळी मुक्तकंठाने स्तुती केली. रश्मी ठाकरे या अनेकांच्या आदर्श आहेत. त्या इन्सापायरिंग वुमन आणि फर्स्ट लेडी ऑफ महाराष्ट्र आहेत. रश्मी ठाकरे आणि माझं बॉडिंग चांगलं आहे, असं त्यांनी सांगितलं. मी ‘मातोश्री’वर गेले होते, तेव्हा त्यांनी माझा पाहुणचार केला होता. त्या जेव्हा वर्षा बंगल्यावर आल्या होत्या, तेव्हा मी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवले होते, अशी आठवण त्यांनी यावेळी सांगितली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here