हायलाइट्स:

  • एनसीबीने मुंबईत टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींचे ड्रग्ज केले जप्त
  • मुंबईतील विलेपार्लेत एनसीबीची मोठी कारवाई
  • ड्रग्ज प्रकरणातील संशयिताचा एनसीबीकडून शोध सुरू
  • एनसीबीने कारवाईची दिली माहिती

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) मंगळवारी मुंबईत अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील विलेपार्ले परिसरातून कोट्यवधी रुपये किंमतीचा हेरॉइनचा साठा जप्त केला आहे. (ncb विलेपार्ले येथे कोट्यवधींचे हेरॉईन जप्त)

एनसीबीने गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील ड्रग्जविरोधी कारवायांमुळे चर्चेत आलेल्या एनसीबीने विलेपार्ले भागात पुन्हा मोठी कारवाई केली आहे. कोट्यवधी रुपयांचे हेरॉइन जप्त केले आहे. एनसीबीनेच याबाबत माहिती दिली आहे. एनसीबीच्या पथकाकडून या प्रकरणातील संशयिताचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असेही एनसीबीकडून सांगण्यात आले.

पान खाऊन ‘तो’ किचनच्या खिडकीबाहेर थुंकला; त्यानंतर घडली भयंकर घटना!

धक्कादायक! महागडे टॅटू, नशेची लत अन् गर्लफ्रेंडवर पैसा उधळण्यासाठी ‘त्यांनी’ हद्दच ओलांडली!
अंमली पदार्थविरोधी अलीकडेच केलेल्या मोठ्या कारवाया

नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरात ऑक्टोबर महिन्यात मोठी कारवाई करण्यात आली होती. डीआरआयने झोनल युनिटने २५ किलो हेरॉइनचा साठा जप्त केला होता. एका कंटेनरमधून हा साठा हस्तगत करण्यात आला होता. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे १२५ कोटी रुपये होती. या प्रकरणात नवी मुंबईतील एका उद्योजकालाही अटक करण्यात आली होती. नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरात इराणहून कंटेनर आला होता. या कंटेनरमधून हेरॉइन आणण्यात आले होते, अशी माहिती मिळाली होती. सप्टेंबरमध्ये डीआरआयने २,९८८.२१ किलो हेरॉइन जप्त केले होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात २१ हजार कोटी इतकी किंमत होती. गुजरातच्या मुंद्रा बंदरात ही कारवाई केली होती. हेरॉइन दिल्लीला नेण्यात येणार होते आणि तेथून देशभरातील विविध राज्यांमध्ये जाणार होते. विशेषतः पंजाबमध्ये ते नेण्यात येणार होते, अशी माहिती नंतर उघड झाली होती. त्यानंतर हे प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले होते. त्याआधीच डीआरआयने या प्रकरणात आठ जणांना अटक केली होती.

ऑनलाइन गेमचा बळी; तिघी बहिणींपासून हिरावून घेतला एकुलता एक भाऊ
मुंबईत थरार! पाठलाग करणाऱ्या पोलिसांवरच चोराने केला चाकूहल्ल्याचा प्रयत्न

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here