इम्रान खान यांनी आणि भारतातील मुस्लिम आणि काश्मिरी जनतेवर होणाऱ्या शोषणाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल इराण आणि तुर्कीच्या राष्ट्र प्रमुखांचे आभार मानले आहेत. त्याच वेळी जगातील इतर मुस्लिम राष्ट्रांनी याबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न केल्याबद्दल ही इम्रान यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
इम्रान खान यांनी ट्विट करून भारताविरोधात थयथयाट व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले की, मुस्लिम जगतातून भारतातील हिंसाचाराविरोधात फार कमीजणांनी आपला निषेध नोंदवला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदू वर्चस्ववादी सरकारविरोधात पाश्चिमात्य देशांनी आवाज उठवला असल्याचे खान यांनी म्हटले.
इराणचे सर्वोच्च नेते खमनेई यांनी भारताविरोधात टीका केल्यानंतर इम्रान यांनी हे ट्विट केले आहे. भारतातील मुस्लिमांविरोधात झालेल्या हिंसाचाराचा निषेध करत इराणने केंद्र सरकारवर टीका केली होती.
आणखी वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times