हायलाइट्स:

  • लांजा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन मागे
  • आमदार साळवी यांनी भेट घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांचा निर्णय
  • ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा दिलासा

रत्नागिरी : गेल्या दोन दिवसांपासून हालचाली बंद करा करणाऱ्या लांजा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी अखेर आपलं आंदोलन मागे घेतलं आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरा लांजा राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. ‘मी पालकमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांची भेट घेतली असून त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे तुम्ही तुमचे आंदोलन मागे घ्या,’ अशी विनंती आमदार राजन साळवी यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केली. या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्र एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण झाले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी लांजा एसटी आगारातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी १ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन सुरू होते. मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन सुरू असल्याने याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सायंकाळी उशिरा आमदार राजन साळवी यांनी आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

MSRTC Employee Stir: राज ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार; ‘या’ प्रश्नावर मनसे आक्रमक

‘मी पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब यांची मुंबईत सोमवारी भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. एसटी कर्मचाऱ्यांवर बजावण्यात आलेल्या नोटीसा मागे घेण्याबाबत तसंच गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनातील कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जाणार नाही, असं ठोस आश्वासन अनिल परब यांनी आपल्याला दिलं आहे. त्यामुळे तुम्ही आंदोलन मागे घ्या ,’ अशी राजन साळवी यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केली होती. त्यानंतर लांजा डेपोतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेत काम सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Nitesh Rane: परमबीर सिंग बेल्जियममध्ये?; नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर थेट आरोप

दरम्यान, यावेळी आमदार राजन साळवी यांच्यासोबत रत्नागिरी विभागीय अधिकारी प्रमोद जगताप, डेपो मॅनेजर संदीप पाटील, लांजा पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे आदी उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here