हायलाइट्स:

  • एखादी व्यक्ती डेटिंग साइटवर अॅक्टिव्ह आहे आणि त्याआधारे त्याच्या नैतिकतेवर बोलता येऊ शकत नाही
  • बलात्काराचा आरोप असलेल्या तरुणाच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीवेळी हायकोर्टाची टिप्पणी
  • आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद खोडून आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला

प्रयागराज: एखादी व्यक्ती डेटिंग साइटवर अॅक्टिव्ह आहे आणि त्याआधारे त्याच्या नैतिकतेवर बोलता येऊ शकत नाही, अशी टिप्पणी अलाहाबाद हायकोर्टाने केली आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या आरोपीच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावर हायकोर्टाने ही टिप्पणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची डेटिंग साइटवरून आरोपीशी ओळख झाली होती. त्यानंतर ती त्याला भेटण्यासाठी गेली. अशात पीडितेच्या नैतिकतेवर संशय निर्माण होतो, असा युक्तिवाद बचाव पक्षाच्या वकिलांनी केला होता. मात्र, कोर्टाने हा युक्तिवाद खोडून काढला आणि अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. पीडितेने आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. लग्नाच्या भूलथापा देत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप तिने तरूणावर केला होता.

मुंबईत उच्चभ्रू सोसायटीत ४ महिन्यांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार, अखेर त्या महिलेने…

सावधान! पुण्यातील महिलेसोबत ‘जे’ घडलं ते कुणासोबतही घडू शकतं!

तरुणीच्या तक्रारीनुसार, आरोपी आणि ती एका डेटिंग साइटवरून संपर्कात आले होते. डेटिंग साइटवर ओळख झाल्यानंतर ते दोघे एकमेकांना भेटले. त्यानंतर तुझ्याशी लग्न करणार आहे, असे वचन तिला दिले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला.

तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर नोएडा येथे राहणाऱ्या आरोपीने अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली. त्या अर्जावर सुनावणी घेण्यात आली. आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला. दोघे संपर्कात आल्यानंतर अवघ्या चार दिवसांतच शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे संबंध परस्पर संमतीने ठेवले आहेत, हे यावरून सिद्ध होते, असे वकिलांनी म्हणणे मांडले. आरोपीने तरुणीला लग्नाचे वचन दिले नव्हते, अशावेळी बलात्काराचा आरोप करणे चुकीचे आहे, अशी बाजू आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना मांडली. मात्र, न्यायमूर्तींनी हा तर्क खोडून काढला. कोर्टात शरण येऊन कार्यवाहीत सहकार्य करण्याचे आरोपीला स्वातंत्र्य आहे, असे कोर्टाने सांगितले.

दोघे तरूण-तरूणी एखाद्या डेटिंग साइटवरून संपर्कात आल्यानंतर भेट झाली. या भेटीत त्या दोघांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण होते. त्या विश्वासाच्या आधारे शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. यावरून कुणाच्या चारित्र्याबाबत दृष्टीकोन तयार करू शकत नाही किंवा नैतिकतेवर बोलू शकत नाही, अशी टिप्पणी कोर्टाने केली.

९६ वर्षांच्या महिलेवर ११ हजार लोकांच्या हत्येचा आरोप, अद्याप खटला सुरू
मुंबईत NCB ची पुन्हा मोठी कारवाई; या भागातून जप्त केले कोट्यवधींचे हेरॉइन

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here