मुंबई : सणासुदीच्या काळात आणि दिवाळीची सुट्टी असल्यामुळे भाविकांचा भर हा देवदर्शनावर असतोच. सुदैवाने यंदा करोनाचे नियम शिथिल झाल्यामुळे अनेक मंदिरही उघडली गेली आहेत. त्यामुळे सुट्ट्यांचा फायदा घेत अनेकजण देवदर्शनाला निघायच्या तयारीत आहेत. पण यासाठी करोनाचे नियम मात्र पाळावे लागणार आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग आणि इतर करोनाच्या नियमांचं पालन करूनच देवदर्शन करावं लागणार आहे.

खरंतर, दिवाळी आहे सुट्टी आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या देवस्थानी भाविकांची गर्दी पाहायला मिळू शकते. यामुळे मंदिर संस्थांनीही स्थानिक स्तरावर नियमांमध्ये काही बदल केले आहेत. शेगावला संत गजानन महाराज मंदिरामध्ये फक्त ऑनलाईन पास असणाऱ्यांनाच दर्शन घेता येणार आहे. भाविकांची गर्दी वाढली तर गोंधळ होऊ शकतो यामुळे संस्थांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

शेगावमध्ये दररोज फक्त नऊ हजार भाविकांनी दर्शनाचा लाभ घेता येणार आहे, तर दहा वर्षांखालील व ६० वर्षांवरील नागरिकांना मंदिरात प्रवेश नाही मिळणार. त्यामुळे जर तुम्ही शेगावला देवदर्शनासाठी जाण्याच्या विचारात असाल तर ऑनलाइन पास काढूनच दर्शनासाठी निघा अन्यथा तुम्हाला प्रवेश मिळणार नाही.

ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळंच वळण; समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी, शिवप्रतिमा भेट देऊन सन्मान
शिर्डीतदेखील ऑनलाईन पास सेवा आहे. शिर्डीत लवकरच ऑनलाइन-ऑफलाइन पास सेवा सुरु होणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थानाने ही तयारी केली आहे. ऑफलाइन पास आणि ऑफलाइन भक्तांसाठी प्रसादने सुरू करावेत अशी मागणी शासनाकडे पाठवण्यात आले. त्यावर लवकरच निर्णय होऊन भाविकांसाठी हे सोयीचे ठरेल.

सध्या फक्त ऑनलाईन पाच सेवा सुरू आहे. पण यामुळे भाविकांची गैरसोय होते. इतकेच नाही तर ऑनलाइन नावाखाली गोरखधंदा सुरू झाला. त्यामुळे ऑफलाईन पास सेवादेखील सुरू व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. अक्कलकोट इथं श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये देखील या नियमांचं पालन करूनच भक्तांना दर्शन खुले करण्यात आले. दिवाळीत या नियमांचं पालन करतच भक्तांना दर्शन देण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही देवदर्शनाला निघत असाल तर या महत्त्वाच्या नियम लक्षात घेऊनच बाहेर पडा.

अशोक चव्हाणांचे राजकीय वजन वाढले; देगलूरच्या विजयानंतर थेट दिल्लीतून फोन

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here