लियाकत आणि रियासत हे ईशान्य दिल्लीतील चाँदबाग येथील दंगलीत सामील होते. तर ताहीर हुसेनला घरात आश्रय दिल्याचा आरोप तारिक रिजवीवर आहे. दिल्ली दंगलीत ताहीर हुसेनचे नाव येतात तारिक रिजवीने ताहीरला आपल्या जाकीर नगरमधील येथील घरात लपवले होते, असं सांगण्यात येतंय.
याआधी आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांनी ताहीर हुसेन यांच्या अटकेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्याचं नाव ताहीर हुसेन आहे. तो एक मुस्लिम आहे म्हणून त्याला शिक्षा होतेय. आता भारतात मुस्लिम असणं गुन्हा ठरला आहे. दिल्लीतील दंगली ताहीर हुसेनने केल्या असंही पुढच्या काही दिवसांत सांगितलं, असं अमानतुल्ला म्हणाले.
घराच्या छतावर आढळले पेट्रोल बॉम्ब
ताहीर हुसेन यांच्या विरोधात काही पुरावे मिळाले आहेत. मीडियातील वृत्तानुसार ताहीर हुसेनच्या घराच्या छातावर मोठ्या प्रमाणावर दगडं, पेट्रोल बॉम्ब आणि काचेच्या बाटल्या आढळून आल्या. सर्व माहितीच्या आधारावर पोलिसांनी ताहीरविरोधात गुन्हा दाखल केलाय. आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येचा आरोपही ताहीरवर करण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times