दापोली : डॉ. बाळासाहेबांच्या सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या बांबू व टाकाऊ लाकडापासून आकर्षक विविध वस्तू निर्मितीच्या कार्यशाळेतील कलाकौशल्याचे कोंदण लाभलेल्या या क्राफ्टना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. कृषी विद्यापीठाच्या वनशास्त्र महाविद्यालयाअंतर्गत हा उपक्रम येथे सुरू आहे. कृषी विद्यापीठाच्या जैवविविधता केंद्रात गेल्यावर ही कार्यशाळा पाहता येते.

आकाशकांदिल, टेबल प्लॉट, शो-पीस, लाकडी नेम प्लेट या वस्तूंबरोबरच बांबू च्या काडीपासून अगरबत्ती बनण्याचा उपक्रमही या कार्यशाळेत सुरू करण्यात आला आहे. कोकणातील शेतकरी, तरूण, महिलांनाही येथे प्रशिक्षण दिले जाते. दीपोत्सवाचा पार्श्वभूमीवर या कार्यशाळेत कलानिर्मिती केलेल्या लाकडी आकाशकंदील, वस्तूंचा विक्रीस्टॉल दापोलीत ग्राहकांना उपलब्ध आहे. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यशाळेबाबत बोलताना डॉ. विश्वदीपक त्रिपाठी यानी सांगितले की, वनशास्त्र महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश आहे.

बांबू लागवडीला प्रोत्साहन देऊन बांबूपासून कलानिर्मिती व टाकाऊ लाकडापासून टिकाऊ पर्यावरणपुरक हा उपक्रम आहे. हा उपक्रम कृषी विद्यापीठात गेली काही वर्षे सुरू आहे. भविष्यात अगरबत्ती उत्पादन करणारा मोठा हब कोकणात होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मोठा वनशास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्रात्यक्षिक याबरोबरच रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी देणारा नवीन उपक्रम आहे. याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. अगरबत्ती लघुउद्योग कोकणात मोठा व्हावा यासाठी कृषी विद्यापीठ प्रयत्नशील आहे.

हा उपक्रमशील प्रयोग भविष्यात यशस्वी झाल्यास कोकणातील अर्थकारणाला एक नवी दिशा मिळू शकणार आहे. कोकणात डोंगराळ असलेल्या कमी पाणी असलेल्या ठिकाणी योग्य प्रकारच्या बांबूची लागवड केल्यास वुडन क्राफ्ट निर्मिती होऊ शकेल अस या कार्यशाळेच्या कामकाज बघितलावर लक्षात येते. मेहनतीची तयारी व शिकण्याची जिद्द याचा अवलंब केल्यास उत्तम प्रशिक्षण येथे कृषि विद्यापीठाच्या माध्यमातून दिले जाते. जोड व्यवसाय म्हणूनही हा उद्योग करता येऊ शकतो या वस्तूंना कोकणात येत असलेल्या पर्यटकांकडूनही मोठी मागणी असते.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here